झटपट कर्ज मिळवण्याच्या नादात गमावाल आयुष्यभराची कमाई, या लिंकवर क्लिक न करण्याचा SBI चा इशारा

झटपट कर्ज मिळवण्याच्या नादात गमावाल आयुष्यभराची कमाई, या लिंकवर क्लिक न करण्याचा SBI चा इशारा

अलीकडे बॅंका किंवा प्रतिष्ठीत फायनान्स कंपन्यांच्या नावे इ-मेल किंवा मेसेज पाठवून ऑनलाईन पध्दतीने तात्काळ कर्ज देण्यासंदर्भात तसेच अन्य आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या (Online Fraud and Phishing) आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: अलीकडे बॅंका किंवा प्रतिष्ठीत फायनान्स कंपन्यांच्या नावे इ-मेल किंवा मेसेज पाठवून ऑनलाईन पध्दतीने तात्काळ कर्ज देण्यासंदर्भात तसेच अन्य आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या (Online Fraud and Phishing) आहेत. अशा घटनांमुळे ग्राहकांना मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तसंच या प्रकार आणि फसवणुकीमुळे होणारा मनस्ताप वेगळाच. मात्र आता हे प्रकार रोखण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागृती होण्यासाठी बॅंका पुढाकार घेत आहेत. सातत्याने याबाबत ग्राहकांना अशा प्रकारे नुकसान टाळण्यासाठी माहिती दिली जात आहे.

आपल्या स्मार्टफोनवर पाॅप-अपसह (Pop-Up) त्वरित कर्जासंदर्भात (Instant Loan) आलेला मेसेज आता ग्राहकांना ओळखता आला पाहिजे. आजच्या पिढीला, आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनेकदा कर्जाची गरज पडते. त्यामुळे कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती फोनवर आलेल्या कर्जासंदर्भातील मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्याची शक्यता असते. परंतु, माहिती न घेता अशा प्रकारे क्लिक करणे नुकसानकारक ठरु शकते, कारण यामुळे तुमचे बॅंक अकाऊंट रिकामे होऊ शकते.

(हे वाचा-घरबसल्या तयार करा Debit Card PIN; समजून घ्या सोपी प्रक्रिया)

ग्राहकांचे अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांपासून संरक्षण व्हावे, याकरिता स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन व्टीट करत, त्यांच्या खातेदारांनी त्वरित आणि विनासायस कर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील कोणत्याही मेसेजमधील लिंकवर क्लिक करु नये, अशी सूचना दिली आहे. तसंच अशा फसव्या त्वरित कर्ज देण्याचं आमिष दाखवणाऱ्या अॅप्स पासून ग्राहकांनी दूर राहावे, एसबीआय किंवा अन्य बॅंकांच्या नावाने येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करुन आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असा सल्ला बँकेने दिला आहे. शिवाय खात्रीशीर माहिती आणि व्यवहारासाठी ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ही मिळवावी अशी माहिती दिली आहे.

जर कोणी व्यक्ती कर्ज घेऊ इच्छित असेल तर त्यांनी थेट बॅंकेच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा सीआयबीआयएल स्कोअर (CIBIL) तपासावा. जर तो बॅंकेच्या रिक्वायरमेंटशी जुळत असेल तर ग्राहकाला सहजासहजी कर्ज मिळू शकेल.

(हे वाचा-Amazon वर ED चं संकट! FEMA अंतर्गत होणार चौकशी)

तसंच कोणत्याही प्रकारची कागदपत्रे डाऊनलोड करण्यापूर्वी किंवा देण्यापूर्वी डाऊनलोड केलेल्या अॅपची सत्यता तपासणे आवश्यक आहे. कर्जाच्या वितरणाचा सर्व तपशील बॅंकेच्या वेबसाईटवर दिलेला आहे. कर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी कस्टमर केअर क्रमांकावर (Customer Care Number) काॅल करावा, असे व्टीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना त्वरित कर्ज देणाऱ्या अॅप्सविषयी अलर्ट करतानाच सुरक्षिततेबाबत टिप्स देखील दिल्या आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 20, 2021, 9:55 AM IST

ताज्या बातम्या