नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of india) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनेकदा नवीन प्रकारच्या सुविधा पुरवते. एसबीआय (SBI) सातत्याने सायबर गुन्हेगारांपासून ग्राहकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेकदा बँका आपल्या ग्राहकांना आवश्यक टिप्स देतात. आता एसबीआयनं ग्राहकांसाठी घरच्या घरी Debit Card PIN पिन जनरेट करण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती दिली आहे.
ग्राहक घरबसल्या देखील ग्रीन पिन (Green PIN) जनरेट करू शकतात. अगदी कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून तुम्ही हा पिन जनरेट करू शकता. बँकेने ट्वीट करून आपल्या टोल-फ्री IVR सिस्टीममधून हा ग्रीन पिन कसा सेट करायचा याची माहिती दिली आहे. यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला असून ही प्रक्रिया पूर्णपणे समजावून सांगितली आहे.
Here are the easy steps to generate your Debit Card PIN or Green PIN via our toll-free IVR system. Don't hesitate to call 1800 112 211 or 1800 425 3800.#SBI #StateBankOfIndia #IVR #debitcard pic.twitter.com/MhuJGcwMa2
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 17, 2021
कॉल करून या पद्धतीने एटीएमचा पिन करा जनरेट
1) तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून 1800 112 211 किंवा 1800 425 3800 टोल फ्री नंबरवर संपर्क करा
2) यानंतर एटीएमसंबधी सूचनांसाठी 2 नंबर दाबा
3) यानंतर पिन जनरेट करण्यासाठी 1 क्रमांक दाबा
4) यानंतर तुम्हाला आयव्हीआर या सेवेचा वापर करण्यासाठी 1 दाबण्यास सांगितला जाईल. तसंच कस्टमर केअरबरोबर बोलण्यासाठी 2 दाबायला सांगितलं जाईल.
5) आयव्हीआरचा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या एटीएमचे शेवटचे पाच आकडे टाकावे लागणार आहेत.
6) हे आकडे कन्फर्म करण्यासाठी 1 नंबर दाबा.
7) जर तुमच्याकडून चुकी झाली तर हे आकडे पुन्हा टाकण्यासाठी 2 दाबा
8) यानंतर तुमच्या बँक खात्याच्या शेवटचे पाच आकडे टाकावे लागतील
9) तुम्ही टाकलेली माहिती बरोबर असेल तर 1 दाबा किंवा पुन्हा टाकण्यासाठी 2 दाबा.
10) यानंतर तुमची बर्थ डेट टाकावी लागणार आहे
11) ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा ग्रीन पिन सेट होणार आहे.
SMS च्या माध्यमातून देखील सेट करू शकता पिन
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मेसेजच्या माध्यमातून देखील तुमच्या एटीएमचा पिन सेट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 'PIN CCCC AAAA असं टाईप करून 567676'या क्रमांकावर SMS करायचा आहे. CCCC म्हणजे एटीएम कार्डचा शेवटचे चार क्रमांक. AAAA म्हणजे बँक अकाउंट क्रमांकाचे चार आकडे आहेत. हा मेसेज केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी आल्यानंतर एसबीआयच्या एटीएममध्ये जाऊन पिन सेट करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Money, SBI, Technology