नवी दिल्ली, 17 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) ग्राहकांना एक महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की तुमच्या पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. याआधी पॅन-आधार लिंक करण्याची (Deadline for linking PAN with Aadhar Card) तारीख अनेकदा वाढवण्यात आली आहे. आता ही डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 आहे. त्यापूर्वी तुम्ही हे काम पूर्ण न केल्यास अनेक आर्थिक कामांचा खोळंबा होऊ शकतो. 30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं. अर्थात तुम्ही कोणत्याही कामाकरता त्या कार्डाचा वापर करू शकत नाही. आयकर, इन्कम टॅक्स रिटर्न, विविध बँकिंग सेवा, सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. अशावेळी जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुमच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. बँकेने काय केलं आहे ट्वीट? SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आम्ही ग्राहकांना असा सल्ला दतो की त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करावे, जेणेकरुन कोणतही असुविधा होणार नाही आणि त्यांना अडथळा न येता बँकिंग सेवा अनुभवता येतील.’
We advise our customers to link their PAN with Aadhaar to avoid any inconvenience and continue enjoying a seamless banking service.#ImportantNotice #AadhaarLinking #Pancard #AadhaarCard pic.twitter.com/p4FQJaqOf7
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 16, 2021
का द्यावा लागेल 10000 रुपयांचा दंड? तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास दंड भरावा लागण्याचीही शक्यता आहे. तसंच पॅन कार्ड पुन्हा सक्रीय करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांची लेट फीज देखील द्यावी लागेल. पॅन कार्ड निष्क्रिय झाले म्हणजे असे मानण्यात येईल की कायद्यानुसार पॅन कार्ड कोट करण्यात आले नाही. त्यामुळे आयकर कायदा 272B अंतर्गत 10000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. ऑनलाइन करता येईल लिंक तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरते तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा, त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.