मराठी बातम्या /बातम्या /मनी /

व्यवसाय सुरू करायचा विचार आहे? या Profitable Business मध्ये होईल मोठा फायदा, सरकारही करेल मदत

व्यवसाय सुरू करायचा विचार आहे? या Profitable Business मध्ये होईल मोठा फायदा, सरकारही करेल मदत

पेपर कप (Paper cup business) हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. देशभरात वाढत्या प्रदूषणादरम्यान केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर बॅन (Plastic ban) लावला आहे. अशात सध्या पेपर कपचा व्यवसाय डिमांडमध्ये (Paper cup demanding business) आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : जर कमी खर्चात तुमचा व्यवसाय (Start own business) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगला पर्याय (profitable business) आहे. यात कमी खर्चात व्यवसाय सुरू करुन (small level business start) चांगली कमाई करता येऊ शकते. पेपर कप (Paper cup business) हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. देशभरात वाढत्या प्रदूषणादरम्यान केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर बॅन (Plastic ban) लावला आहे. अशात सध्या पेपर कपचा व्यवसाय डिमांडमध्ये (Paper cup demanding business) आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, पेपरकप मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावण्यासाठी सरकारही मुद्रा योजनेअंतर्गत मदत करत आहे. केंद्र सरकारकडून प्रोजेक्ट रिपोर्टही तयार करण्यात आला आहे, ज्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चापासून होणाऱ्या नफ्यापर्यंत संपूर्ण कॅल्युलेशन देण्यात आलं आहे.

इथे खरेदी करता येईल मशीन -

कागदी कप बनवणारी मशीन दिल्ली, हैदराबाद, आग्रा, अहमदाबादसह अनेक शहरांत मिळते. अशा प्रकारच्या मशीन तयार करण्याचं काम इंजिनियरिंग वर्क करणाऱ्या कंपन्या करतात.

किती येईल खर्च -

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 500 स्क्वेअर फूट जागेची गरज असते. मशिनरी, इक्विपमेंट, इक्विपमेंट फीस, फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री ऑपरेटिव्हसाठी खर्च 10.70 लाख रुपयांपर्यंत येईल.

जर तुम्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही प्रकारचे वर्कर ठेवले तर यासाठी जवळपास 35000 रुपये महिना खर्च येईल.

रॉ मटेरियल खर्च - 3.75 लाख रुपये

यूटिलिटीज खर्च - 6000 रुपये

इतर खर्च - 20,500 रुपये

Franchise घ्या आणि घर बसल्या कमवा लाखो रुपये; जाणून घ्या सविस्तर

किती होईल नफा -

हा व्यवसाय सुरू केल्यास तुम्ही वर्षातील 300 दिवस काम करू शकता. 300 दिवसांत जळपास 2.20 कोटी यूनिट पेपर कप तयार करू शकता. त्याशिवाय प्रति कप किंवा ग्लास जवळपास 30 पैसे हिशोबाने विक्री करू शकता.

तुम्ही घरातूनच करू शकता हा व्यवसाय, महिना 45 हजार मिळेल उत्पन्न, पहा सर्व माहिती

सरकारकडून मिळेल मदत -

केंद्र सरकारच्या मुद्रा लोन अंतर्गत या व्यवसायासाठी मदद मिळू शकते. कर्ज काढून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. मुद्रा लोन अंतर्गत सरकार व्याजावर सब्सिडी देते. या योजनेअंतर्गत एकूण व्यवसायाच्या 25 टक्के तुम्हाला गुंतवावे लागतील. तर 75 टक्के लोन सरकारकडून दिलं जाईल.

First published:

Tags: Business News, Small investment business, Start business