मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्ही घरातूनच करू शकता हा व्यवसाय, महिना 45 हजार मिळेल उत्पन्न, पहा सर्व माहिती

तुम्ही घरातूनच करू शकता हा व्यवसाय, महिना 45 हजार मिळेल उत्पन्न, पहा सर्व माहिती

हा हायड्रोपोनिक्स शेतीचा (hydroponic farming) व्यवसाय आहे. हे शेतीचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्रात मातीशिवाय लागवड केली जाते. हायड्रोपोनिक शेतीत झाडे फक्त पाण्यात किंवा वाळूमध्ये किंवा रेतीमध्ये उगवली जातात.

हा हायड्रोपोनिक्स शेतीचा (hydroponic farming) व्यवसाय आहे. हे शेतीचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्रात मातीशिवाय लागवड केली जाते. हायड्रोपोनिक शेतीत झाडे फक्त पाण्यात किंवा वाळूमध्ये किंवा रेतीमध्ये उगवली जातात.

हा हायड्रोपोनिक्स शेतीचा (hydroponic farming) व्यवसाय आहे. हे शेतीचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्रात मातीशिवाय लागवड केली जाते. हायड्रोपोनिक शेतीत झाडे फक्त पाण्यात किंवा वाळूमध्ये किंवा रेतीमध्ये उगवली जातात.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : आज आपण एका खास आणि नवीन व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कमी पैशाने करू शकता आणि जास्त नफा कमवू शकता. या व्यवसायाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठीचे काम तुम्ही घरातून सुरू करू शकता. ज्यात तुम्हाला जास्त जागेची देखील गरज भासणार नाही. हा हायड्रोपोनिक्स शेतीचा (hydroponic farming) व्यवसाय आहे. हे शेतीचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्रात मातीशिवाय लागवड केली जाते. हायड्रोपोनिक शेतीत झाडे फक्त पाण्यात किंवा वाळूमध्ये किंवा रेतीमध्ये उगवली जातात.

या तंत्राने तुम्ही शेती करून मोठी कमाई करू शकता

हायड्रोपोनिक शेती कशी केली जाते?

हायड्रोपोनिक शेतीत पाईप्स वापरून झाडे उगवली जातात. पाईपमध्ये अनेक छिद्रे राहतात, ज्यात झाडे लावली जातात. वनस्पतींची मुळे पाईपच्या आत पोषक तत्वांनी युक्त पाण्यात सोडली जातात. या पद्धतीत स्फुरद, नायट्रोजन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅश, जस्त, गंधक, लोह इत्यादी अनेक पोषक आणि खनिजे यांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून द्रावण तयार केले जाते. हे द्रावण निर्धारित वेळेच्या अंतराने पाण्यात मिसळले जाते. ज्यामुळे झाडांना सर्व पोषण मिळते.

ही शेती घराच्या छतावरही करता येते

याप्रकारची शेती आपण आपल्या घरी किंवा टेरेसवर देखील सुरू करू शकता. 100 चौरस फुटांमध्ये सुमारे 200 झाडे वाढवता येतात. यासाठी किमान 25 हजार ते लाख रुपयांच्या खर्चासह सुरुवात करता येईल.

या सर्व गोष्टींची लागवड करता येते

या तंत्राद्वारे लहान रोपांची पिके घेता येतात. गाजर, सलगम, काकडी, मुळा, बटाटे, शिमला मिर्च, मटार, मिरपूड, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, टरबूज, कॅंटलूप, अननस, सेलेरी, तुळस इत्यादी

हे वाचा - कॉलेजमधील मित्रानं केला घात! गुंगीचं औषध देत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लील VIDEO केला शूट

या व्यवसायात किती खर्च येईल?

हायड्रोपोनिक यंत्रणा उभारण्यासाठी सुरुवातीला फक्त जास्त खर्च येतो. या पद्धतीमुळे कमी जागेत जास्त झाडे घेता येतात. म्हणून काही काळानंतर शेतकरी या पद्धतीने अधिक नफा कमवू शकतात. जर तुम्हाला छोट्या प्रमाणावर सुरू करायचे असेल तर तुम्ही 100 चौरस फूट क्षेत्रात देखील सेट करू शकता. याची किंमत 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत असू शकते.

40 ते 45 रुपये मिळतील

जर कोणी घरातूनच या तंत्राद्वारे आधुनिक शेती करणार असेल तर एका महिन्यात 40 ते 45 हजार रुपये मिळू शकतात. जर कोणी एक एकरमध्ये हे तंत्र वापरून शेती केली तर चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. विशेष म्हणजे नापीक जमिनीवरही याची लागवड करता येते.

First published:
top videos

    Tags: Agriculture, Small business