मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Franchise घ्या आणि घर बसल्या कमवा लाखो रुपये; जाणून घ्या सविस्तर

Franchise घ्या आणि घर बसल्या कमवा लाखो रुपये; जाणून घ्या सविस्तर

सध्याच्या काळात अनेक कंपन्या फ्रँचायझी (Franchise) देतात. या कंपन्यांच्या फ्रँचायझी स्वीकारून आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो.

सध्याच्या काळात अनेक कंपन्या फ्रँचायझी (Franchise) देतात. या कंपन्यांच्या फ्रँचायझी स्वीकारून आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो.

सध्याच्या काळात अनेक कंपन्या फ्रँचायझी (Franchise) देतात. या कंपन्यांच्या फ्रँचायझी स्वीकारून आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो.

मुंबई, 16 सप्टेंबर-  आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत, की जो तुम्ही फारशी गुंतवणूक न करता सुरू करू शकता. त्यातून दर महिन्याला चांगली कमाईही करू शकता. सध्याच्या काळात अनेक कंपन्या फ्रँचायझी (Franchise) देतात. या कंपन्यांच्या फ्रँचायझी स्वीकारून आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. तसंच यात फारसं नुकसान होण्याची शक्यता नसते. त्यामुळे अशा कोणत्या कंपन्यांची फ्रँचायझी मिळू शकते, याची माहिती घेऊ या.

सर्वांत पहिल्यांदा आपण अशा उत्पादनाबद्दल माहिती घेऊ या, की ज्याची मागणी कधीच कमी होत नाही. त्यामुळे अशा उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला, तर नफा नक्की मिळतोच. ही उत्पादनं म्हणजे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ. या पदार्थांच्या विक्रीची फ्रँचायझी घेऊन चांगला नफा मिळवता येऊ शकतो.

अमूल फ्रँचायझी :

अमूल डेअरीचं (Amul Dairy) नाव भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. ही डेअरी कोणत्याही रॉयल्टीशिवाय किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी देते. अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्च खूप जास्त नाही. दोन लाख रुपये ते सहा लाख रुपये खर्चून या संदर्भातला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. अमूलतर्फे दोन प्रकारची फ्रँचायझी दिली जाते. पहिला प्रकार म्हणजे अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल किऑस्कची फ्रँचायझी. दुसरा प्रकार म्हणजे अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. पहिल्या प्रकारात गुंतवणूक करायची असेल, तर दोन लाख रुपयांची आवश्यकता असते. दुसऱ्या प्रकारात गुंतवणूक करायची असेल, तर पाच लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 ते 50 हजार रुपये यासाठी द्यावे लागतात. अमूलच्या फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल, तर retail@amul.coop या ई-मेल आयडीवर ई-मेल करावा लागतो. http://amul.com/m/amul-scooping-parlours या लिंकवर जाऊनही अधिक माहिती मिळू शकते.

(हे वाचा:प्रत्येक महिन्याला फक्त 1000 रुपये करा जमा; मिळतील तब्बल 12 लाख रुपये)

आधार कार्ड फ्रँचायझी :

आधार कार्ड (Aadhaar Card) फ्रँचायझीही तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आधी UIDAI द्वारे घेतली जाणारी एक परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं. त्यानंतर सर्व्हिस सेंटर उघडण्यासाठी लायसेन्स दिलं जातं. परीक्षा पास झाल्यानंतर आधार एन्रोलमेंट नंबर आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमधून रजिस्ट्रेशन करावं लागतं.

आधार फ्रँचायझी लायसेन्स घेण्याविषयीच्या अधिक माहितीसाठी https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या लिंकवर अधिक माहिती उपलब्ध आहे.

(हे वाचा:कोणत्याही कागदपत्रांशिवाय घरबसल्या मोफत मिळवा इन्स्टंट PAN Card, पाहा सोपी पद्धत)

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी :

पोस्ट खात्यातर्फेही (Post Office) वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात. त्याद्वारे पैसे मिळवता येतात. पोस्ट खात्यातर्फे दोन प्रकारची फ्रँचायझी दिली जाते. पहिला प्रकार आउटलेटचा आहे, तर दुसरा प्रकार पोस्टल एजंट्स फ्रँचायझी हा आहे. फ्रँचायझी घेण्यासाठी केवळ पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. फ्रँचायझी घेतल्यानंतर कमिशनच्या माध्यमातून पैसे मिळवता येतात.

पोस्टाची फ्रँचायझी घेण्यासाठी पोस्ट खात्याचं अधिकृत नोटिफिकेशन वाचावं आणि अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा. https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या लिंकवरून तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकेल.

First published:

Tags: Business News, Money