Home /News /money /

भारतीय रेल्वेबरोबर सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला होईल लाखोंची कमाई

भारतीय रेल्वेबरोबर सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला होईल लाखोंची कमाई

आत्मनिर्भर भारत (aatma nirbhar bharat) अभियानाअंतर्गत भारतीय रेल्वे (Indian Railway) सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) सहभागी होण्याची संधी देत आहे.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: जर तुम्ही देखील स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही आता भारतीय रेल्वेसमवेत मिळून कमाई (Business with indian railways) करू शकता. तुम्ही कमी गुंतवणुकीतून चांगली कमाई करू शकता. आत्मनिर्भर भारत (Aatma Nirbhar Bharat) अभियानाअंतर्गत भारतीय रेल्वे (Indian Railway) सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) सहभागी होण्याची संधी देत आहे. जर तुम्ही देखील यामध्ये सहभाग घेऊ इच्छित असात तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. यामध्ये तुम्ही एक उत्तम कमाई करू शकता. रेल्वेला उत्पादन विकून करा कमाई रेल्वे दरवर्षी साधारण 70,000 कोटींपेक्षाही जास्त किंमतीचे उत्पादन खरेदी करते. यामध्ये टेक्निकल (technical) आणि इंजिनीअरिंग प्रोडक्ट्सबरोबरच दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रोडक्टचा समावेश आहे. अशावेळी एक छोटा उद्योजक म्हणून तुम्ही रेल्वेला तुमचं प्रोडक्ट विकू शकता. इथे करा तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन जर तुम्ही देखील रेल्वेबरोबर व्यवसाय करू इच्छित आहात तर https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in वर रजिस्ट्रेशन करू शकता. (हे वाचा-ग्राहकांना SBI ने केलं सावधान! परवानगीशिवाय हे काम केल्यास केली जाईल कठोर कारवाई) कशाप्रकारे सुरू कराल नवीन व्यवसाय? -जी कंपनी मार्केटमध्ये स्वस्त सामानाचा पुरवठा करते, त्यांच्याकडून रेल्वे विविध प्रोडक्ट्स खरेदी करते. त्यामुळे तुम्हाला देखील असे प्रोडक्ट निवडायचे आहेत जे तुम्ही कोणत्याही कंपनीकडून स्वस्तात खरेदी करू शकता -यानंतर तुम्ही एक  डिजिटल सिग्नेचर (digital signature) बनवा. याच्या मदतीने तुम्ही https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in वर जाऊन नवीन टेंडर पाहू शकता. - टेंडर देताना तुम्हाला तुमचे उत्पन्न, खर्च आणि प्राफिट लक्षात घेणे गरजेचे आहे. -याशिवाय तुमच्या प्रोडक्ट्सचे रेट्स स्पर्धात्मक असतील तर तुम्हाला टेंडर मिळणं सोपं होईल. (हे वाचा-आयकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यामध्ये पाठवले 1.36 लाख कोटी,वाचा सविस्तर) याशिवाय एमएसएमईला (MSME) प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे एक मोठा निर्णय घेत आहे. रेल्वे कोणत्याही टेंडरसाठी 25 टक्के पर्यंतच्या खर्चाच्या खरेदीत एमएसएमईंना 15 टक्क्यांपर्यंत प्राधान्य मिळेल. याशिवाय छोट्या उद्योगांना सुरक्षा ठेव आणि सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटींमधूनही सूट देण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Indian railway, Small business

    पुढील बातम्या