नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत आयकर विभागाने (Income Tax Department) 40 लाखांपेक्षा जास्त करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. यामध्ये 35,750 कोटी रुपयांचा पर्सनल इनकम टॅक्स (PIT) आणि जवळपास एक लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड (Corporate Tax Refund) समाविष्ट आहे. इनकम टॅक्स विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.
इनकम टॅक्स विभागाने या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) 40.19 लाख करदात्यांना 1 एप्रिल 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत 1,36,066 कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला आहे. 38,23,304 प्रकरणात 35,750 कोटी रुपयांचा इनकम टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे तर 1,95,518 प्रकरणात 1,00,316 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.'
CBDT issues refunds of over Rs. 1,36,066 crore to more than 40.19 lakh taxpayers between 1st April,2020 to 17th November,2020. Income tax refunds of Rs. 35,750 crore have been issued in 38,23,304 cases &corporate tax refunds of Rs.1,00,316 crore have been issued in 1,95,518 cases
हा रिफंड अशाच करदात्यांना जारी केला जातो ज्यांनी आयटीआर (ITR) फाइल केला आहे. आयकर विभागाकडून तुम्ही भरलेल्या कराची माहिती तपासली जाते, जर त्यातून काही रिफंड देण्याचे शिल्लक असेल तर रिफंड जारी केला जातो. जाणून घ्या आयटीआर फाइल केल्यानंतर तुम्ही तो कसा ट्रॅक करू शकता आणि तुम्हाला रिफंड मिळेल की नाही
-याकरता तुम्हाला आयकराच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जावे लागेल. याठिकाणी पोर्टल लॉग इन करून तुमचा पॅन क्रमांक, ई-फायलिंग पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा
-त्याठिकाणी ड्रॉप डाऊन मेन्यूतून ‘Income Tax Returns’ वर क्लिक सबमिट करा. हायपरलिंक अॅकनॉलेजमेंट क्रमांकावर क्लिक केल्यानंतर नवीन स्क्रीन दिसेल
-याठिकाणी तुम्हाला फायलिंगची टाइमलाइन, प्रोसेसिंग टॅक्स रिटर्नबाबत माहिती मिळेल. फायलिंगची तारीख, रिटर्न व्हेरिफाय करण्याची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, रिफंड जारी करण्याची तारीख आणि पेमेंट रिफंडबाबत माहिती मिळेल.
-जर तुमचा टॅक्स रिफंड फेल झाला असेल, तर याठिकाणी स्क्रीनवर त्याचे कारण देखील सांगितले जाईल.