Home /News /money /

कोरोनाच्या संकटकाळात 2 लाखामध्ये सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 1 लाखाची कमाई

कोरोनाच्या संकटकाळात 2 लाखामध्ये सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 1 लाखाची कमाई

लॉकडाऊनमध्ये सर्वानाच काही ना काही प्रमाणात फटका सहन करावा लागला आहे. अशावेळी एक व्यवसाय असा आहे की सुरुवातीला गुंतवणूक करून त्या नंतर मोठी कमाई करता येईल.

    नवी दिल्ली, 16 जून : कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वानाच काही ना काही प्रमाणात फटका सहन करावा लागला आहे. अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे, तर काहींची पगरकपात झाली आहे. एकंदरीत प्रत्येक जण कमाईसाठी एक पर्याय शोधत आहे. काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अशावेळी एक व्यवसाय असा आहे की सुरुवातीला गुंतवणूक करून त्या नंतर मोठी कमाई करता येईल. याकरता तुमच्याकडे तुमची जमीन असणं आवश्यक आहे. राखेपासून बनणाऱ्या विटा हा व्यवसाय जमीन असल्यास करणं शक्य आहे. तुमच्याकडे 100 यार्ड जमीन असल्यास हा व्यवसाय सुरू करता येईल. याकरता तुम्हाला सुरुवातीला 2 लाखाची गुंतवणूक करावी लागेल या व्यवसायात तुम्हाला महिना 1 लाख कमाई होऊ शकते. सध्या ठिकठिकाणी शहरीकरण सुरू झाल्यामुळे बिल्डर्स फ्लाय एश (Fly Ash Business) विटांचा वापर करत आहेत. वाचा-'या' कर्मचाऱ्यांची पुढील वर्षापर्यंत पगारवाढ नाही, सरकारने जारी केले आदेश दर महिन्याला 3 हजार विटा बनवणे शक्य या विटा वीज सयंत्रापासून निघणारी राख, सिमेंट आणि स्टोन डस्टच्या मिश्रणापासून बनवण्यात येतात. या व्यवसायात सर्वाधिक खर्च याकरता लागणाऱ्या मशनरी सेटअपसाठी करावा लागतो. याकरता लागणाऱ्या मॅन्यूअल मशिन्सना 100 यार्ड जमीनीची आवश्यकता असते. वीट उत्पादनासाठी 5 ते 6 लोकांची गरज असेल. यामध्ये साधारण रोज 3000 विटांचे उत्पादन घेता येईल. या गुंतवणुकीमध्ये कच्च्या मालासाठी लागणारे उत्पादन सामील नाही आहे. वाचा-15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी नागरिकांचा होणार फायदा ऑटोमिक मशीनचाही पर्याय उपलब्ध या व्यवसायासाठी ऑटोमेटिक मशीनच्या वापरामुळे कमाई अधिक होण्याची शक्यता असते. या ऑटोमिक मशीनची किंमत 10 ते 12 लाख रुपये आहे. कच्च्या मालाच्या मिश्रणासाठी ते वीट बनवण्यासाठी प्रत्येक कामासाठी मशिनची आवश्यकता आहे. ऑटोमिक मशीनच्या माध्यमातून प्रत्येक तासाला हजार मशिन वापरता येतील. म्हणजे महिन्याला या मशीनच्या माध्यमातून महिन्याला 3 ते 4 लाख विटा बनवता येतील. सरकारकडून मिळू शकतं लोन हा व्यवसाय बँकेकडून लोन घेऊन देखील सुरू करता येईल. प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत या व्यवसायासाठी लोन मिळवता येईल. मुद्रा लोनचा देखील उपलब्ध आहे. मात्र उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेशमसारख्या राज्यांमध्ये मातीची कमतरता असल्यामुळे विटांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब सारख्या राज्यांमधून विटा मागवल्या जातात, त्यावेळी ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो. अशावेळी याजागी सिमेंट आणि स्टोनडस्टपासून बनणाऱ्या विटांचा कारभार फायदेशीर ठरू शकतो. पहाडी भागात स्टोनडस्ट सहज मिळत असल्याने कच्चा मालासाठी खर्च कमी येतोय. वाचा-कोरोना काळात मोठे आर्थिक संकट समोर, या 5 मार्गांनी मिळवू शकता पैसे संपादन-जान्हवी भाटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या