मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' कर्मचाऱ्यांची पुढील वर्षापर्यंत पगारवाढ नाही, सरकारने जारी केले आदेश

'या' कर्मचाऱ्यांची पुढील वर्षापर्यंत पगारवाढ नाही, सरकारने जारी केले आदेश

याचिकेनुसार वीर चंद्र सिंह गढवाली योजना बेरोजगार, एसटी-एससी वर्ग, माजी सैनिकांसाठी आखण्यात आली आहे. मात्र याअंतर्गत लाखो रुपयांचा कर्ज हरिद्वार जिल्ह्यातील लाखांमध्ये 12 करोडपतींना वाटण्यात आलं आहे.

याचिकेनुसार वीर चंद्र सिंह गढवाली योजना बेरोजगार, एसटी-एससी वर्ग, माजी सैनिकांसाठी आखण्यात आली आहे. मात्र याअंतर्गत लाखो रुपयांचा कर्ज हरिद्वार जिल्ह्यातील लाखांमध्ये 12 करोडपतींना वाटण्यात आलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees)पगारवाढीसाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 16 जून : केंद्र सरकारने जारी केलेल्या एका ऑर्डरमध्ये सांगण्यात आले आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees)पगारवाढीसाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग (DoPT)ने जारी केलेल्या आदेशानुसार, केंद्र सरकारने 2019-20 साठी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा अॅन्युअल परफॉरमन्स अॅसेसमेंट रिपोर्ट (APAR)पूर्ण करण्याचा कालावधी वाढवला आहे. मार्च 2021 पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला आहे. याआधी ही तारीख 31 डिसेंबर 2020 होती. मार्च महिन्यामध्ये देखील सरकारने अप्रेजलची प्रक्रिया (Appraaisal Process) डिसेंबरपर्यंत वाढवली होती. नवीन आदेशानुसार हे स्पष्ट होत आहे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी मार्च 2021 ची वाट पाहावी लागेल. वाचा-15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी नागरिकांचा होणार फायदा सरकारच्या नवीन आदेशानंतर हे कर्मचारी होणार प्रभावित DoPT कडून 11 जून रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, सध्याची एकूण परिस्थिती पाहता APAR प्रक्रिया डिसेंबर 2020 वरून मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रृप ए, बी आणि सी चे कर्मचारी प्रभावित होणार आहेत. सामान्यपणे 31 मार्चला पूर्ण होणारी ही प्रक्रिया आता पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. वाचा-कोरोना काळात मोठे आर्थिक संकट समोर, या 5 मार्गांनी मिळवू शकता पैसे 31 जुलैपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑनलाइन फॉर्म घेता येईल सरकारी आदेशानुसार पगारवाढीसाठीचा फॉर्म भरण्याची मुदत 31 मे 2020 होती. मात्र लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी सरकारने हा कालावधी वाढवला आहे. आता केंद्र सरकारी कर्मचारी 31 जुलै पर्यंत हा ऑनलाइन फॉर्म भरू शकतील. त्याचप्रमाणे रिपोर्टिंग ऑफिसरला देखील सेल्फ-अप्रेजल 31 ऑगस्टपर्यंत जमा करता येईल. याआधी याची डेडलाइन 30 जून होती. कर्मचाऱ्यांकडून अप्रेजल प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक या प्रक्रियेतील रिपोर्ट समीक्षक अधिकाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म्स APAR सेलकडे पाठवण्यात येतील. यानंतर 31 डिसेंबरपर्यंत अप्रेजल प्रक्रिया पूर्ण करायची आहे. संपूर्ण एपीएआरची प्रक्रिया 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. वाचा-तुम्ही PAN कार्ड संबंधित ही चूक केली आहे? द्यावा लागेल 10,000 रुपयांचा दंड संपादन-जान्हवी भाटकर.
First published:

Tags: Pm modi

पुढील बातम्या