जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी नागरिकांचा होणार फायदा

15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी नागरिकांचा होणार फायदा

15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना,  81 कोटी नागरिकांचा होणार फायदा

अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी अशी माहिती दिली आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांना पोषक तत्वयुक्त तांदूळ उबलब्ध करून दिला जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : देशात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. या काळात गरिबांसाठी अनेक योजना मोदी सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण (Central Consumer Affairs, Food and Public Distribution)मंत्री रामविलास पासवान यांनी अशी माहिती दिली आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अर्थात एनएफएसए (NFSA) अंतर्गत लाभार्थ्यांना पोषक तत्वयुक्त  तांदूळ उबलब्ध करून दिला जाणार आहे. त्याकरता सरकारने 15 राज्यांच्या एक-एक जिल्ह्यामध्ये राइस फोर्टिफिकेशनची (Rice Fortification)पायलट योजना सुरू केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील निवडक जिल्ह्यांमध्ये पौष्टिक तांदूळ वाटप केले जात आहे.  NFSA अंतर्गत देशातील जवळपास 81 कोटी रेशन कार्डधारकांना स्वस्त अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. (हे वाचा- कोरोना काळात मोठे आर्थिक संकट समोर, या 5 मार्गांनी मिळवू शकता पैसे ) या पौष्टिक तांदळाचे वाटप ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये देखील लवकरच सुरू केले जाणार आहे, अशी माहिती पासवान यांनी दिली आहे. अन्य राज्यांमध्ये देखील ही योजना लवकरच सुरू केली जाणार आहे. आपल्या ट्वीटमध्ये पासवान असं म्हणाले की, ‘आयरन, फोलिक एसिड आणि व्हिटामिन बी12 युक्त या पौष्टिक तांदळामुळे कुपोषण आणि रक्ताची कमतरता दूर केली जाऊ शकते.’

जाहिरात

पासवान यांनी भारतीय खाद्य महामंडळाला (FCI) सरकारी योजनांअंतर्गत अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी 4 महिन्याचे अन्नधान्य देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात सामोरे जावे लागणाऱ्या समस्या डोळ्यासमोर ठेवून हा आदेश देण्यात आला आहे. यासंदर्भातही त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात