नवी दिल्ली, 15 जून : कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचली आहे. भारतामध्ये देखील अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत तर काहींच्या पगारामध्ये कपात झाली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या कंपन्याच बंद पडल्या आहेत, परिणामी या काळात त्यांना घरी बसावे लागले. एकंदरीत या काळात आलेले आर्थिक संकट मोठे आहे. अशावेळी अनेकांनी त्यांचे मोठे खर्च कमी केले आहेत. पण तरीही काही खर्च असे असतात जे तुम्ही टाळू शकत नाही. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. काही इन्शुरन्स, EMI याच्या डेडलाईन वाढवल्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी काही वेळा पैशांची चणचण भासू शकते. अशावेळी पैसे मिळवण्यासाठी काही मार्गांचा अवलंब तुम्ही करू शकता.
1. गोल्ड लोन
तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याच्या आधारावर तुम्ही सोने कर्ज घेऊ शकता. आता कर्ज काढून जेव्हा तुमची नोकरी सुरळीत होईल त्यावेळी कर्ज फेडून तुम्हाला तुमचे सोने परत मिळवता येईल.
2. PF मधून काढू शकता पैसे
मोदी सरकारने कोरोना काळात नोकरदार वर्गाला प्रोव्हिडेंट फंड (PF) मधून पैसे काढण्याची सूट दिली आहे. तुमच्यासमोर पैशांचे संकट आल्यास कोरोना काळात तुम्ही 75 टक्के पैसे काढू शकता.
3. वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
अनेक मोठ्या बँका कोरोनाच्या संकटकाळात कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देऊ करत आहेत. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नेशनल बँक, इंडियन बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देत आहेत.
(हे वाचा-तुम्ही PAN कार्ड संबंधित ही चूक केली आहे? द्यावा लागेल 10,000 रुपयांचा दंड)
कोरोनाच्या संकटकाळात कर्ज घेतेवेळी बँकांकडून काही ऑफर देण्यात येत आहेत, व्याजदर देखील तुलनेने कमी आकारला जात आहे. सामान्यत: पर्सनल लोनवर 8.75 ते 25 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. मात्र सध्याच्या संकटकाळात हे दर 7.20 ते 10.25 टक्क्यांपर्यंत कमी आले आहेत.
4. एफडीवर ओव्हरड्राफ्ट
तुम्ही एफडी काढली असाल तर त्यावर ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता. देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआय देखील ही सेवा देते. SBI च्या वेबसाइटवरील माहितीच्या आधारे वैयक्तिक खाते असणारे ग्राहक, ज्यांची एफडी वैयक्तिक नावावर आहे ते या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. जाईंट खाते असणाऱ्यांना बँक शाखेमध्ये जाऊन ही सुविधा उपलब्ध करावी लागेल
5. इन्शूरन्स पॉलिसीवर कर्ज
इन्शूरन्स पॉलिसीमध्ये मॅच्यूरिटीमध्ये रिटर्नच्या व्यतिरिक्त पॉलिसीधारकांना यामध्ये लोन सुविधा देखील मिळते. तुमची कोणती इन्शूरन्स पॉलिसी काढली असल्यास त्या बदल्यात तुम्हाला लोन मिळू शकेल. त्यासाठी अर्ज करणे सोपे आहे आणि हे कर्ज लवकर मिळते देखील.
(हे वाचा-अलर्ट! 30 जूनपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा हा नियम, वाचा सविस्तर)
संकलन, संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus