मुंबई : स्पाइसजेट एअरलाईन्सचे शेअर असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीला मोठा दणका मिळाला आहे. बुधवारी डीजीसीएने कंपनीवर मोठी कारवाई केली. आधीच कर्मचाऱ्यांना पगार न देता सक्तीच्या सुट्टीवर पाठवल्याने कंपनीबद्दल नाराजी होती. आता तर दुसरा मोठा दणका मिळाला आहे. स्पाइसजेटवर DGCA कडून कारवाई करण्यात आली. ५० टक्के उड्डाण स्थगित ठेवण्याच्या निर्णय DGCA कायम ठेवला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे स्पाइसजेट कंपनीच्या शेअरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शेअर्स असतील त्यांनी जास्त काळासाठी ठेवू नयेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर लाँग टर्मसाठी नफ्याचे ठरतील की नाही याबाबतही शंका व्यक्त केली आहे. हे वाचा-रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई शेअर बाजारातील स्पाइसजेटच्या किंमती दिवसेंदिवस खाली येत आहेत. त्यामुळे आणखी तोट्याची वाट पाहण्यापेक्षा असलेले शेअर्स काढून टाकण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आज मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 40.05 रुपये आहे. ही ४.३० टक्क्यांनी घसरल्याचं सांगितलं जात आहे.
Directorate General of Civil Aviation (DGCA) extended restrictions on SpiceJet to operate only 50% of departures till October 29, 2022.
— ANI (@ANI) September 21, 2022
DGCA though notes that there is appreciable reduction in number of safety incidents. pic.twitter.com/f0GnQ80A8Q
गेल्या काही महिन्यांत स्पाइसजेटमधील तांत्रिक बिघाडांची अनेक प्रकरणे चर्चेत आहेत. बर्याच विमानांनी आपत्कालीन लँडिंग केल्याच्या घटना समोर आल्या. ज्यामुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण झाल्या. या सर्व घटनांची डीजीसीएने दखल घेतल्यानंतर एक महत्त्वाचा 4 कलमी निर्देश जारी करण्यात आला. हे वाचा-US फेडर रिजर्व्हकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ, आशियातील बाजारपेठेवर मोठा परिणाम एअरलाइनला दिलेल्या निर्देशांबाबत डीजीसीएने आज एका निवेदनात म्हटले आहे की, स्पाईसजेट पुरेसा तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक संसाधने दाखवून फ्लाइट्सची संख्या वाढवू शकते. मात्र कंपनीवर बारीक नजर असेल असंही म्हटलं आहे.