मुंबई : अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने बुधवारी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली. यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर 0.75% वाढवले. व्याजदर 3-3.2 टक्के वाढले. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी पुढच्या बैठकीत पुन्हा व्याजदर वाढू शकतात असे संकेत यूएस फेडने दिले आहेत. यापूर्वी 27 जुलै रोजी व्याजदरात वाढ करण्यात आली होती. यूएस फेड महागाईमुळे चिंतेत आहे. यूएस फेड महागाई 2% पर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मध्यवर्ती बँकेचा अंदाज आहे की ते 2023 पर्यंत व्याजदर 4.6 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय बँक व्याजदार वाढ करत आहे. या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून आला आहे. गुरुवारी रुपया घसरला आणि डॉलरचं मूल्य वाढलं. २० वर्षातील सर्वात जास्त रुपया घसरला आहे. त्यामुळे आयातीवर जास्त पैसे मोजावे लागू शकतात. इंधन, डाळी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. हे वाचा-रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई
At today's meeting, Federal Open Market Committee raised its policy interest rate by 3/4 percentage points, bringing target range to 3-3.25%. We're moving our policy stance that will be sufficiently restrictive to return inflation to 2%: Jerome Powell, chair of US Federal Reserve pic.twitter.com/hYhfdLK7lS
— ANI (@ANI) September 21, 2022
या निर्णयामुळे अमेरिकेतील शेअज बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याचा परिणाम आशियातील शेअर मार्केटवरही झाला. म्हणावी तेवढी तेजी गुरुवारी पाहायला मिळाली नाही. सणासुदीच्या काळात महागाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची चिंता आहे.