Home /News /money /

PPF वरील व्याजदर किती असावा? काय आहे RBI चं म्हणणं

PPF वरील व्याजदर किती असावा? काय आहे RBI चं म्हणणं

छोट्या बचत योजनांच्या व्याजदराविषयी (Small Saving Scheme Interest Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर: छोट्या बचत योजनांच्या व्याजदराविषयी (Small Saving Scheme Interest Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. RBI ने असं म्हटलं आहे की, गेल्या सहा महिन्यात  छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल न केल्याने सरकार सार्वजनिक भविष्य निधि (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसाठी फॉर्म्युला-आधारित दरापेक्षा 47-178 बेसिस पॉइंटने अधिकचे पेमेंट करत आहे. पीपीएफ (What should be the PPF rate according to RBI) किंवा NSC साठी किती व्याजदर असावा याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीदरम्यान PPF या छोट्या बचत योजनेसाठी 7.10% दराने व्याज देण्यात येत आहे. आरबीआयच्या मते PPF स्कीमवर 6.63% व्याज असायला हवे. त्याचप्रमाणे NSC VIII बाबत सरकारने सध्या देत असलेल्या 6.8% व्याजाच्या तुलनेत 6.14% व्याज द्यावे. आरबीआयने आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, बँक ठेवींवरील माफक व्याजदर आणि छोट्या बचतीवरील अपरिवर्तित व्याजदर यामध्ये छोट्या बचत योजना ठेवीदारांसाठी आकर्षक बनल्या आहेत.' वाचा-Paytm Payments Bank ला मोठा झटका, RBI ने ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड काय म्हणालं आरबीआय? छोट्या बचतीवरील व्याजात होणारी वाढ 2018 पासून बँक ठेवींच्या तुलनेत सातत्याने वाढली आहे आणि त्यातील अंतर सुद्धा वाढले आहे, अशी माहिती आरबीआयच्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. वाढत्या क्रेडिट डिमांडमुळे छोट्या बचत योजनांनाही तेजी आली आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) ने चालू तिमाहीसाठी अनुक्रमे 7.1% आणि 6.8% वार्षिक व्याज दर देणे सुरू ठेवले आहे. लहान बचत योजनांचे व्याज दर तिमाही आधारावर जारी केले जातात. वाचा-Penny Stocks : स्वस्त असणाऱ्या पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय? एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 5.5 टक्के कायम आहे. तर मुलींसाठी असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 7.6 व्याज दिले जात आहे. या खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. पंचवार्षिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4% कायम ठेवला आहे.  ज्येष्ठ नागरिक योजनेवर तिमाही व्याज दिले जाते. बचत ठेवींवरील व्याज दर वार्षिक 4% राहील. एक ते पाच वर्षांच्या FD वर व्याज दर 5.5-6.7%च्या दरम्यान असेल, जो तिमाही भरला जाईल, तर पाच वर्षांच्या आवर्ती ठेवींवर 5.8%व्याज दर मिळत राहील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rate of interest, Rbi, Rbi latest news

    पुढील बातम्या