मुंबई, 21 ऑक्टोबर: देशातील सर्वोच्च बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया पाठोपाठ (
RBI Imposes fine on Paytm Payment Bank Ltd.) आता प्रमुख पेंमेंट्स बँकेपैकी एक पेटीएम पेमेंट्स बँकेला (
Paytm Payments Bank) आरबीआयने मोठा झटका दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लि. (
PBBL) ला 1 कोटी रुपयांचा भूर्दंड बसला आहे. काही नियमांचं उल्लंघन केल्यानी आरबीआयने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपासून आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियावरही इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली होती. आता PBBL वर पेमेंट अँड सेटलमेंटचे कलम 26(2) अंतर्गत कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे प्रकरण पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करण्याशी संबंधित आहे. RBIने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या प्राधिकरणाचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाठीच्या अर्जाची तपासणी केल्यावर, असे आढळले की पेटीएम पेमेंट्स बँकेने अशी माहिती दिली आहे जी वास्तविक स्थिती दर्शवत नाही. 'हे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायद्याच्या कलम 26 (2) चे उल्लंघन असल्याने पेटीएम पेमेंट्स बँकेला नोटीस बजावण्यात आली होती,' असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.
वाचा-भारतात पुन्हा येणार High Paid Salary चे दिवस! होणार सरासरी 9.3% पगारवाढ
वैयक्तिक सुनावणी दरम्यान प्राप्त लेखी उत्तरे आणि तोंडी इनपुटचे पुनरावलोकन केल्यानंतर, आरबीआयच्या आरोपात तथ्य असल्याचे आढळले. यानंतर पीपीबीएलवर दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली.
वेस्टर्न युनियनवर 27.8 लाख रुपयांचा दंड
आणखी एका वेगळ्या प्रकरणात पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त, आरबीआयने वेस्टर्न युनियन फायनान्शिअल सर्व्हिसेसविरोधात मोठी कारवाई केली. मध्यवर्ती बँकेने वेस्टर्न युनियनवर 27.8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBIने म्हटले आहे की वेस्टर्न युनियनने मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम (एमटीएसएस) च्या काही नियमांचे उल्लंघन केले आहे. वेस्टर्न युनियनला एका आर्थिक वर्षात 30 पेक्षा रेमिटेंसची परवानगी दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
वाचा-Penny Stocks : स्वस्त असणाऱ्या पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय?
याआधी रिझर्व्ह बँकेने SBI वर ठोठावला होता 1 कोटींचा दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI वर दंड ठोठावला होता. RBI च्या नियामक निर्देशांचं (Regulatory Directions) पालन न केल्याप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला RBI ने 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, SBI कडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्देश 2016 चं (फ्रॉड्स क्लासिफिकेशन अँड रिपोर्टिंग बाय कमर्शियल बँक्स अँड सिलेक्ट फाइनेंशियल इंस्टिट्यूशन्स) पालन न केल्याप्रकरणी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.