मराठी बातम्या /बातम्या /मनी /Penny Stocks : पेनी स्टॉक म्हणजे काय? स्वस्त असणाऱ्या पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय?

Penny Stocks : पेनी स्टॉक म्हणजे काय? स्वस्त असणाऱ्या पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय?

बाजारातील अस्थिरतेच्या काळात, पेनी स्टॉकच्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त तोटा सहन करावे लागतो. कधीकधी असे घडते की सर्व पैसे एकाच वेळी बुडतात.

बाजारातील अस्थिरतेच्या काळात, पेनी स्टॉकच्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त तोटा सहन करावे लागतो. कधीकधी असे घडते की सर्व पैसे एकाच वेळी बुडतात.

बाजारातील अस्थिरतेच्या काळात, पेनी स्टॉकच्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त तोटा सहन करावे लागतो. कधीकधी असे घडते की सर्व पैसे एकाच वेळी बुडतात.

मुंबई, 20 ऑक्टोबर : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करताना पैसे कमी असल्याने काही गुंतवणूकदार पेनी स्टॉक्समध्ये (Penny Stocks) गुंतवणूक करतात. यात त्यांना जास्त पैसे गुंतवावे लागत नाहीत आणि अधिक लाभ मिळतो. पण अशा शेअर्समध्ये जोखीम नफ्यापेक्षा जास्त असते. हे कमी किंमतीचे स्टॉक ज्यांचे मार्केट कॅप (MArket Cap) देखील कमी असते. अर्थात हे पेनी स्टॉक्स म्हणजे सोप्या भाषेत, ज्या कंपन्यांचे शेअर्स 10 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे आहेत त्यांना पेनी स्टॉक म्हणतात.

पेनी स्टॉक्समध्ये रिस्क किती?

पेनी स्टॉक्समध्ये रिस्क खुप जास्त असते. आज तकच्या वृत्तात एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी सांगितल्याप्रमाणे बाजार सध्या तेजीत आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटी शेअर्समध्ये गुंतवणूके केली पाहिजे. कारण जर बाजारात मोठी पडझड झाली तर सर्वाधिक नुकसान पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेल्यांचे होईल. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना गुड मॅनेजमेंट, बिझनेस आणि आऊटलूक पाहणे गरजेचं आहे. तसेच कंपनी कर्जमुक्त असावी किंवा कर्ज असलं तरी ते कमी प्रमाणात असावे.

Mutual Fund मध्ये थेट गुंतवणूक कशी कराल? जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे

बाजारातील अस्थिरतेच्या काळात, पेनी स्टॉकच्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त तोटा सहन करावे लागतो. कधीकधी असे घडते की सर्व पैसे एकाच वेळी बुडतात. तसेच पेनी स्टॉकचे ऑपरेटर देखील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यासाठी शेअर्स खरेदी करून किंमत वाढवतात. अशा वेळी, गुंतवणूकदारांना पेनी स्टॉकचे धोके आणि नफा खूप जवळून समजून घ्यावा लागतो. योग्य माहितीशिवाय गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. आसिफ यांच्या मते- 'पेनी स्टॉकमध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करू नका. कोणत्याही स्टॉकमध्ये स्थान घेण्यापूर्वी तुमचा स्टॉप लॉस लक्षात ठेवून नेहमी गुंतवणूक करा.

Axis Bank ची धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर! होम लोनवर 12 EMI ची सूट तर आणखीही बेनिफिट्स

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा फायदा

पेनी स्टॉकच्या कमी किमतीमुळे, त्यात गुंतवणूक करणे सोपे असते. कधीकधी बाजारात तेजीचा फायदा जास्त असतो. आज तकच्या वृत्ता प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीचे डायरेक्टर अविनाश गोरक्षकर यांनी सांगितले की, जर बाजारात तेजी आली तर सर्वात आधी पेनी स्टॉक्स वधारतात. त्यामुळे सर्व पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे धोकादायक असते असं नाही. कंपनीचं बिझनेस मॉडेल कसं आहे, फ्युचर कसं आहे, कर्ज किती आहे हे पाहून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे दीवान फायनान्स, सुजलॉन, येस बँक या कंपन्यांमध्ये रिटेल इन्वेस्टर्सनी आपली भागीदारी अचानक वाढवली आणि कंपनीचे इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्स आज बाहेर आहेत. पेनी स्टॉकमधील रिस्क आणि नफ्याचा प्रश्न आहे, तेथे मार्जिन सुरक्षिततेची हमी नाही. तसेच स्टॉकशी संबंधित सर्व अस्थिरता बाजाराच्या बातम्यांवर अवलंबून असते. एक उदाहरण म्हणजे सिम्फनी कंपनीचा स्टॉक काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या खाली होता आणि आजच्या तारखेमध्ये कंपनीचा शेअर 2000 रुपयांचा आहे. परंतु, हे लक्षात ठेवा की पेनी स्टॉकमध्ये यशाचा दर फक्त 1 ते 2 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

First published:
top videos