Cyber Attack: 44 कोटी ग्राहकांना SBI चा इशारा! या चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे

Cyber Attack: 44 कोटी ग्राहकांना SBI चा इशारा! या चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना संभाव्य सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना संभावित सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. बँकेने रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ग्राहकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या संभावित सायबर हल्ल्याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये एसबीआयने ग्राहकांना असं आवाहन केले आहे की, हे हल्लेखोर कोव्हिड-19 च्या नावाखाली बनावट इमेल पाठवून लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरी करत आहेत. याआधी दिल्ली सायबर सेलने देखील लोकांना व्हाट्सअॅपवरून बँकेसंबंधीत माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले होते. या हॅकर्सकडून बँक डिटेल्स सर्रास हॅक केले जात आहेत.

(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात नोकरी गेल्यानंतरही द्यावा लागणार Income Tax, वाचा सर्व नियम)

एसबीआयने त्यांच्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'आमच्या असे नजरेत आले आहे की भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये सायबर हल्ला होऊ शकतो. ncov2019@gov.in वरून येणारे मेल, ज्याची सबजेक्ट लाइन 'Free COVID-19 Testing' अशी आहे, या मेलपासून सावध राहा'

एसबीआयने त्यांच्या एका निवेदनामध्ये अशी माहिती दिली आहे की जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल हॅकर्सनी चोरी केले आहेत. फ्री कोरोना टेस्ट करण्याबाबत मेल करून ते अनेकांना गंडा घालत आहेत. ncov2019@gov.in यावरून हे फेक मेल्स केले जात आहेत. एसबीआयने देशातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांना बनावट मेलसंदर्भात अधिक सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

(हे वाचा-लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या कंपन्यांना सरकारचा मोठा दिलासा,घेतला महत्त्वाचा निर्णय)

भारत कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याआधीच यासंदर्भात इशारा देत प्रत्येक सरकारी विभागांना याबाबत सूचित करण्यात आले होते. यावेळी हॅकर सामान्य नागरिकांना त्यांची शिकार बनवत आहेत.

2016 मध्ये बँकिंग संबंधातील संस्थांना मोठ्या सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. ज्यावेळी अनेक एटीएम प्रभावित झाले होते. डेबिट कार्डच्या पिनबरोबरच वैयक्तिक माहिती चोरी गेली होती.

First published: June 22, 2020, 12:31 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या