'द्वेष आणि भीती पसरवू नका', संकटाच्या काळात मार्ग दाखवणारी रतन टाटा यांची पोस्ट VIRAL

'द्वेष आणि भीती पसरवू नका', संकटाच्या काळात मार्ग दाखवणारी रतन टाटा यांची पोस्ट VIRAL

टाटा समूहाचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) नुकतेच सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. काही पोस्ट आणि प्रतिक्रिया देऊन त्यांनी अनेकांची मनं जिंकली आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 जून : टाटा समूहाचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) नुकतेच सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. काही पोस्ट आणि प्रतिक्रिया देऊन त्यांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. मात्र सध्या त्यांनी केलेली एक पोस्ट काळजाला भिडणारी आहे. कारण ही पोस्ट सध्याच्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मदतगार ठरू शकते. एक विचार करायला लावणाऱ्या पोस्टमधून त्यांनी ऑनलाइन द्वेष आणि भीती पसरवणाऱ्या मजकुराबाबत भाष्य केले आहे. रतन टाटा यांनी जणू काही या पोस्ट मधून सध्याच्या संकटकाळात कसं आयुष्य जगावं यासाठी मार्ग दाखवला आहे. त्यांनी ऑनलाइन पसरणारा द्वेष आणि धमक्या रोखण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळात त्यांनी एकमेकांचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे.

उद्योगपती रतन टाटा यांनी या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'सारख्या स्तरावर किंवा काही प्रमाणातहे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. मी पाहतोय की ऑनलाइन कम्यूनिटी एकमेकांना दुखावत आहे, एकमेकांबाबत त्वरित आणि कठोर मतं बनवून त्यांना खाली खेचत आहेत.'

(हे वाचा-Cyber Attack: ग्राहकांना SBIचा इशारा! या चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे)

View this post on Instagram

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

एकमेकांची मदत करा

रतन टाटा यांनी एकमेकांना साहाय्य करण्याचे आवाहन या मेसेजमधून केले आहे. ते पुढे म्हणाले की, 'माझं असं मत आहे की हे वर्ष एकमेकांना एकजुटीने आणि सहकार्याने वागण्याचे आवाहन करत आहे, ही एकमेकांना खाली खेचण्याची ही वेळ नव्हे. एकमेकांप्रती अधिक संवेदनशीलतेने, अधिक दयाळूपणे आणि अधिक समजुतदारपणे वागणे आवश्यक आहे.'

(हे वाचा-COVID-19: लोकांना जीवनदान देणाऱ्या नीता अंबानी जगातील दानशूर व्यक्तींच्या यादीत)

'माझं ऑनलाइन अस्तित्व फार कमी आहे, पण मी मनापासून आशा करतो की, तुमचे कारण कोणतेही असो, द्वेषाऐवजी ते अस्तित्व सहानुभूतीच्या आणि समर्थनासाठीच विकसीत होईल.'

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 22, 2020, 1:33 PM IST
Tags: ratan tata

ताज्या बातम्या