याठिकाणी एफडीवर मिळत आहे 9 टक्के व्याज, कमी कालावधीत होतील पैसे दुप्पट

याठिकाणी एफडीवर मिळत आहे 9 टक्के व्याज, कमी कालावधीत होतील पैसे दुप्पट

सध्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. या काळातही काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर 8 ते 9 टक्के व्याज देत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जुलै : सध्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. या  काळातही काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर 8 ते 9 टक्के व्याज देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यांसारख्या अनेक बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँकेत एफडी रेट्स अधिक आकर्षक आहेत. जर तुम्ही देखील या काळात फायदा मिळवू शकता तर या एफडीवर विचार करू शकता.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे हे नवे एफडी रेट्स 3 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. तुम्हाला 7 ते 45 दिवसांच्या आणि 45 ते 90 दिवसांच्या एफडीवर अनुक्रमे 4 टक्के आणि 4.5 टक्के व्याज मिळेल. 181 ते 364 दिवसांच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज मिळेल. एक वर्ष ते 699 दिवसापर्यंत मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळेल.

(हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरूच, सलमानच्या EX-मॅनेजरची तब्बल 5 तास चौकशी)

या बँकेत 700 दिवसांनी म्यॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर सर्वाधिक म्हणजे 8 टक्के व्याज मिळत आह.  701 ते 3,652 दिवसांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या एफडीसाठी 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

या स्मॉल फायनान्स बँकेत 1 मे 2020 पासून नवीन एफडी दर लागू करण्यात आले आहेत. या बँकेत 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के आणि 45 ते 90 दिवसांच्या एफडीवर 5 टक्के व्याज मिळत आहे. 91 दिवसांपासून  6 महिन्यासाठी असणाऱ्या एफडीवर आणि 6 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत असणाऱ्या एफडीवर अनुक्रमे 5.5 टक्के आणि 6.50 टक्के व्याज मिळेल. 9 महिने 1 दिवस ते एका वर्षासाठी काढण्यात आलेल्या एफडीवर 7 टक्के व्याजदर मिळेल.

(हे वाचा-अभिनेत्री बेपत्ता होण्याआधीचे CCTV फुटेज समोर, तलावात बुडून मृत्यू झाल्याचा संशय)

ही बँक 1 ते 2 वर्षांच्या एफडीसाठी 7.25 टक्के व्याजदर देत आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षापासून 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज मिळेल. 3 वर्षांरपासू 5 वर्षापर्यंत मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळत आहे. 5 वर्षांनी मॅच्यूअर होणाऱ्या  एफडीवर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक उच्चतम म्हणजेच 9 टक्के व्याज देत आहे. 5 वर्षापासून 10 वर्षांमध्ये मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 7.25 टक्के व्याज मिळेल.

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँकेने लागू केलेले नवे व्याजदर 1 जून 2020 पासून लागू होत आहेत. या बँकेत तुम्ही 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत एफडी काढू शकता. 7 ते 45 दिवसांसाठी आणि 45 ते 90 दिवसांसाठी एफडीचे व्याजदर अनुक्रमे 4 टक्के आणि 4.25 टक्के आहेत. 91 ते 180 दिवसांसाठी एफडीवर 4.50 टक्के व्याज मिळेल.

(हे वाचा-'या' 3 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो कोरोना व्हायरस)

181 ते 364 दिवसांच्या एफडीवर 5.5 टक्के तर 365 ते 729 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याजदर आहे. या बँकेत सर्वात जास्त व्याज अर्थात 8 टक्के व्याज 730 ते 1095 दिवसांच्या एफडीवर मिळते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 12, 2020, 8:08 AM IST
Tags: bank fd

ताज्या बातम्या