• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेत्री बेपत्ता होण्याआधीचे CCTV फुटेज आले समोर, तलावात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय

अभिनेत्री बेपत्ता होण्याआधीचे CCTV फुटेज आले समोर, तलावात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय

हॉलिवूड अभिनेत्री आणि Glee star नाया रिव्हेरा (Naya Rivera) बुधवारपासून बेपत्ता आहे. दरम्यान नाया तिच्या 4 वर्षाच्या मुलाबरोबर तलावामध्ये फिरण्यासाठी जाण्याआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 • Share this:
  कॅलिफोर्निया, 11 जुलै : हॉलिवूड अभिनेत्री आणि Glee star नाया रिव्हेरा (Naya Rivera) बुधवारपासून बेपत्ता आहे. दरम्यान नाया तिच्या 4 वर्षाच्या मुलाबरोबर तलावामध्ये फिरण्यासाठी जाण्याआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अभिनेत्री तलावाकाठी तिचा मुलगा Josey बरोबर गाडीतून उतरताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार वेन्चूरा कंट्री (Ventura County) पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर या घटनेबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येत आहेत. अन्य काही मीडिया अहवालानुसार दरम्यान 33 वर्षांची ही अभिनेत्रीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही अभिनेत्री तिच्या 4 वर्षांच्या मुलाबरोबर तलालावर फिरण्यासाठी गेली होती. त्याकरता तिने भाड्याने एक बोट देखील घेतली होती. त्यानंतर अभिनेत्री तलावामध्ये कुठेतरी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणामुळे सर्वजण हैराण आहेत. या अभिनेत्रीचा घटनेच्या 3 दिवसांनंतरही अद्याप तपास सध्या सुरू आहे. (हे वाचा-Beach Vibes देणारं अनुष्काचं बोल्ड फोटोशूट,विराटची प्रत्येक फोटोवर अशी कमेंट) त्याचप्रमाणे तिचा 4 वर्षांचा मुलगा पोलिसांंना त्यांनी घेतलेल्या बोटीमध्ये एकटाच  सापडला होता. नायाने बेपत्ता होण्याआधी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाबरोबर एक फोटो देखील पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टवर देखील चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. चाहते तिची खुशाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
  View this post on Instagram

  just the two of us

  A post shared by Naya Rivera (@nayarivera) on

  अशी माहिती मिळते आहे की , नायाने बुधवारी दुपारी 3 तासाकरता एक बोट तलाव फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती. तीन तासानंतरही ठरलेल्या वेळेत त्यांची नाव न परतल्याने त्याठिकाणी असणारे कर्मचारी नावेपर्यंत पोहोचले. कॅलिफोर्निया जवळ असणाऱ्या या पीरु लेकमधील बोटीमध्ये त्यांना नायाचा मुला Josey मिळाला पण नायाचा काही पत्ता लागला नाही. अशी माहिती समोर येत आहे की अभिनेत्री मुलाबरोबर त्याठिकाणी स्विमिंग करत होती, पण केवळ तिचा मुलगाच बोटीमध्ये परतला.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: