• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरूच, सलमान खानच्या EX-मॅनेजरची तब्बल 5 तास चौकशी

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरूच, सलमान खानच्या EX-मॅनेजरची तब्बल 5 तास चौकशी

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची देखील चौकशी झाली. दरम्यान या यादीमध्ये आता आणखी एक हाय प्रोफाइल नाव जोडले गेले आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येला आता जवळपास 1 महिना पूर्ण होत आला आहे. मात्र अद्यापही सुशांतने आत्महत्या का केली यामागचे ठोस कारण मुंबई पोलिसांना सापडले नाही आहे. या प्रकरणात 30 हून अधिक जणांची चौकशी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची देखील चौकशी झाली. दरम्यान या यादीमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध टॅलेंड मॅनेजमेंटची हेड असणारी रेश्मा शेट्टी (Reshma Shetty) हिची मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली. रेश्मा अभिनेता सलमान खानची (Salman Khan) एक्स-मॅनेजर आहे. सलमान खानसाठी तिने काही वर्ष काम पाहिले होते. मुंबई पोलिसांनी जवळपास 5 तास रेश्माची चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूतमध्ये असणाऱ्या वादाबाबत आणि बॉयकॉटबाबत ही चौकशी करण्यात आली. (हे वाचा-अभिनेत्री बेपत्ता होण्याआधीचे CCTV फुटेज समोर, तलावात बुडून मृत्यू झाल्याचा संशय) रेश्मा शेट्टीने अशी माहिती दिली की, ती सुशांतला केवळ दोन वेळा भेटली आहे. तिने असे स्पष्टीकरण दिले आहे की, सलमानने सुशांत सिंह राजपूतला इंडस्ट्रीने बॉयकॉट करावे याकरता दबाव टाकला या निव्वळ अफवा आहे. रेश्मा शेट्टीने सलमान खान बरोबरच अक्षय कुमारसाठी देखील टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. (हे वाचा-Beach Vibes देणारं अनुष्काचं बोल्ड फोटोशूट,विराटची प्रत्येक फोटोवर अशी कमेंट) सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या आठवड्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी सुशांत सिंग सोबत चित्रपट  करण्याचा विचार करत होते. तारखांच्या गडबडींमुळे आणि इतर काही कारणांमुळे सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या चौकशीत सुशांतला चित्रपटातून काढून टाकण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, सुशांतचे पूर्ण लक्ष यशराज फिल्सच्या येणाऱ्या चित्रपटाकडे होते. सुशांतने दोन मोठ्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. संजय लीला भन्साळी यांच्या मते त्यांनी कधीही सुशांतला त्यांच्या चित्रपटातून 'ड्रॉप' केले नव्हते या महिन्यात प्रदर्शित होणार सुशांतचा शेवटचा सिनेमा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) च्या दिल बेचारा या सिनेमाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सिनेमा 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दिल बेचारा या सिनेमामध्ये सुशांतबरोबर 'संजना सांघी' (Sanjana Sanghi)  हा नवा चेहरा दिसणार आहे. दिग्दर्शक आणि कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा (Mukesh Chabra)  यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Hotstar ) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: