• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • 'या' 3 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो कोरोना व्हायरस

'या' 3 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो कोरोना व्हायरस

कोरोनावरील संशोधनातून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 11 जुलै: कोरोनाचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाहीय. कोरोनाचा संसर्ग सातत्यानं आपली रुपं बदलत आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सातत्यानं जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य संस्था मार्गदर्शक सूचना आणि सल्ला देत आहेत. तसेच कोरोनावरील संशोधनातून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आणखीन काही कोरोनाची लक्षण समोर आली आहेत. कोरोनाची चाचणी केलेल्या लोकांमध्ये आणखीन काही लक्षणं आढळून आली आहेत. जी कोरोनाच्या सामान्य लक्षणापेक्षा थोडी वेगळी आहेत आणि त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही कोणती तीन लक्षणं आहेत जाणून घ्या. उलटी होणं सतत उलटी होणं आणि अस्वस्थ वाटणाऱ्या व्यक्तींनी जेव्हा कोरोनाची तपासणी केली तेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. डायरिया दुसरं म्हणजे डायरिया झालेल्या व्यक्तींना जेव्हा औषधांनी बरं वाटेना झालं तेव्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अशा व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. हे वाचा-कार आणि बाईकच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, भयानक दृश्य CCTV मध्ये कैद काही करण्याची इच्छा न होणं, मळमळ... मळमळण किंवा एखाद्या गोष्टीची किळस येणं, मळमळ होण्याच्या समस्येसह या रुग्णांना शरीराच्या कोणत्याही भागामध्ये वेदना किंवा अस्वस्थता होती. वारंवार मळमळ होण्याची समस्या झोपेची कमतरता जाणवत होती. त्यामुळे या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह होतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 2 लाख 83 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासांत देशात 519 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 22 हजार 123 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 15 हजार 385 कोरोनाग्रस्त रुग्णांनी या व्हायरसवर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: