मराठी बातम्या /बातम्या /मनी /

10000 रुपये गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई; वाचा सविस्तर

10000 रुपये गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई; वाचा सविस्तर

कोरोना काळात अनेकांनी स्वत:चा छोटेखानी व्यवसाय सुरू केला (Start own business) आहे. तुम्ही देखील या बिझनेस आयडियाचा (Business idea in less money) विचार करू शकता. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 हजारांची गुंतवणूक करावी लागेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 26 संप्टेंबर: जर तुम्हाला देखील स्वस्त:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर (Start own business) या बिझनेस आयडियाचा (Business idea in less money) तुम्ही विचार करू शकता. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय म्हणजे टिफिन सर्व्हिसचा  (Tiffin Service business). यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

मुंबई-पुण्यासारख्या शहरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा तरुण-तरुणी शिक्षणासाठी आलेले असतात. घरचं जेवण मिळावं याकरता त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ते अशा टिफिन सेवेवर अवलंबून असतात. काम-शिक्षणानिमित्त घराबाहेर राहावे लागत असल्याने या वर्गाला जेवण बनवण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे तुमची टिफिन सर्व्हिस त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. तुम्हा वर्गाची जेवणाची मागणी पूर्ण केल्यास तुमचाही फायदा होईल.

हे वाचा-महत्त्वाचे: Aadhaar Card च्या साहाय्याने मिळवा पर्सनल लोन, फॉलो करा या स्टेप्स

10 हजार रुपयांची छोटी रक्कम गुंतवून करा सुरुवात

असे मानले जाते की माउथ-पब्लिसिटी या व्यवसायात अधिक यशस्वी आहे. हे काम सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र घेण्याचीही गरज नाही. कारण तुम्ही त्याची सुरुवात तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून करणार (Small Business Idea From Home) आहात. टिफिन सेवेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला फक्त 8-10 हजार रक्कम खर्च करावी लागेल. काही महिन्यांनंतर तुम्हाला नफा मिळण्यास सुरुवात होईल.

दिल्लीत टिफिन सेवेचा व्यवसाय करणाऱ्या निमिषा जैन  म्हणतात की, जर तुमच्या अन्नाची गुणवत्ता चांगली असेल आणि ग्राहकांच्या चवीचं जेवण असेल तर तुम्ही लवकरच महिन्याला 1-2 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता. निमिषाने टिफीनचा हा व्यवसाय लॉकडाऊन मध्ये फक्त 8 हजार मध्ये सुरु केला आणि आज लाखोंचे उत्पन्न येत आहे.

हे वाचा-अवघ्या 150 रुपयांत मिळवा अनलिमिटेड फायदे; Jio, Airtel आणि Vi चे जबरदस्त प्लॅन्स

क्लालिटीकडे द्या लक्ष

टिफिन सर्व्हिस सुरू करताना तुम्ही छोटी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू, टिफिन सेवेसाठी लागणारे डबे, चमचे, काही भांडी यांची आवश्यकता भासेल. हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला क्वालिटीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुम्ही मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता. फेसबुक-इन्स्टाग्रामवर पेज बनवून तुम्ही रीतसर ग्राहक मिळवू शकता. याठिकाणीही तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

First published:

Tags: Business, Business News, Small business