मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /अवघ्या 150 रुपयांत मिळवा अनलिमिटेड फायदे; Jio, Airtel आणि Vi चे जबरदस्त प्लॅन्स

अवघ्या 150 रुपयांत मिळवा अनलिमिटेड फायदे; Jio, Airtel आणि Vi चे जबरदस्त प्लॅन्स

Best Recharge Plan: ग्राहकांच्या सोयीनुसार स्वस्त प्लॅन्स लाँच करण्याकडे या टेलिकॉम कंपन्यांचा कल असतो. तुम्हाला देखील अशा स्वस्त प्लॅनविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Best Recharge Plan: ग्राहकांच्या सोयीनुसार स्वस्त प्लॅन्स लाँच करण्याकडे या टेलिकॉम कंपन्यांचा कल असतो. तुम्हाला देखील अशा स्वस्त प्लॅनविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Best Recharge Plan: ग्राहकांच्या सोयीनुसार स्वस्त प्लॅन्स लाँच करण्याकडे या टेलिकॉम कंपन्यांचा कल असतो. तुम्हाला देखील अशा स्वस्त प्लॅनविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मुंबई, 26 सप्टेंबर: ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध ऑफर्स (Special Recharge Offers) घेऊन येत असतात. आघाडीच्या कंपन्यांमध्ये तर ग्राहकांनी त्यांचे प्लॅन्स खरेदी करावेत याकरता चढाओढ सुरू असते. ग्राहकांच्या सोयीनुसार स्वस्त प्लॅन्स लाँच करण्याकडे या टेलिकॉम कंपन्यांचा कल असतो. तुम्हाला देखील अशा स्वस्त प्लॅनविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या प्लॅन्सबाबत तुम्ही संबंधित कंपन्यांच्या वेबसाइटवर देखील माहिती मिळू शकते. हे प्लॅन्स 150 रुपयांपेक्षाही कमी आहेत. जाणून घ्या एंटरटेनमेंटसह तुम्हाला या रिचार्जमध्ये कोणते फायदे मिळतील.

Reliance Jio चा काय आहे प्लॅन?

Reliance Jio चा 149 रुपयांचा रिचार्ज तुम्हाला चांगले बेनिफिट्स (Reliance Jio prepaid recharge plan benefits) मिळवून देईल. यामध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलची सुविधा आहे. यामध्ये दर दिवशी 1 जीबी डेटा तसंच 100 SMS मिळतील. यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, आणि JioCloud या app चा अॅक्सेस देखील मिळेल.

Google New Feature: या खास फीचरद्वारे Lock करता येणार फोटो-व्हिडीओ

Airtel चा 149 रुपयांचा स्वस्त रिचार्ज

एअरटेल देखील ग्राहकांना स्वस्त रिचार्ज (airtel prepaid recharge plan benefits) देत आहे. जिओप्रमाणे हा प्लॅन देखील 149 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि एकूण 2 जीबी मिळतात.  Airtel चा आणखी 1 प्लॅन जो 129 रुपयांचा आहे. ज्यात यूजर्स अनलिमिटेड कॉल आणि 1GB डेटाचा वापर करू शकतात.   यामध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटी मिळेल.

WhatsApp Trick: इतरांचं Status तर पाहाल पण Seen लिस्टमध्ये दिसणार नाही तुमचं नाव

VI चा हा रिचार्जही जबरदस्त फायद्याचा

वोडाफोन-आयडिया (Vodafone-idea prepaid recharge plan benefits) ही टेलिकॉम कंपनी 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. यात ग्राहकाला 2 जीबी डेटा आणि 300 SMS मिळतील. याशिवाय VI चा आणखी एक 99 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यात तुम्हाला एमबी इंटरनेट डेटा मिळेल. मात्र यात SMS नाही आहेत. याची व्हॅलिडिटी 18 दिवस आहे. याशिवाय 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यात युजरला 1 जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

First published:

Tags: Mobile