मुंबई, 26 सप्टेंबर: सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card Benefits) हे अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे. अगदी बँक खातं उघडण्यापासून ते एखादा सरकारी फॉर्म भरण्यासाठी हा दस्तावेज महत्त्वाचा आहे. साधं नवीन सिम कार्ड काढायचे असेल तरी आधार कार्ड लागते. त्यामुळे सध्या आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी, पीएफ खात्याशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. लिंकिंगची ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून त्याकरता विविध डेडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधार हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे.
आधार कार्डाच्या साहाय्याने घेता येईल वैयक्तिक कर्ज
आधी नमुद केलेल्या कामांसाठी आधारची मदत होतेच पण त्याचबरोबर पर्सनल लोन (How to get Personal Loan) मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड महत्त्वाचे आहे. तुम्ही लाखोंचं कर्ज आधार कार्डची कॉपी देऊन मिळवू शकता. आधारच्या साहाय्याने तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम हे सुनिश्चित करावे लागेल की तुमच्या आधार कार्डावरील सर्व तपशील योग्य आहे ना. माहिती योग्य असल्यास तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अप्लाय करू शकता. ही सुविधा मिळवण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 23 ते जास्तीत जास्त 60 असावे लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हे वाचा-Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही, घर बांधण्यासाठीही मिळतं कर्ज?
फॉलो करा या स्टेप्स
>> ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन करा.
>> त्याठिकाणी असणाऱ्या कर्जाच्या पर्यायामध्ये जाऊन पर्सनल लोनवर क्लिक करा
>> याठिकाणी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही ते दिसेल. पात्रता कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अप्लाय करू शकता
हे वाचा-Gold Rate: 22 कॅरेटचा दर 46 हजारांपेक्षाही कमी, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील भाव
>> अर्ज भरण्याची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक, उत्पन्नाबाबत आणि व्यवसायाबाबत माहिती द्यावी लागेल. तुमची ही माहिती बँकेकडून व्हेरिफाय केली जाईल
>> यानंतर तुम्हाला आधार कार्डची कॉपी अपलोड करावी लागेल.
>> तुम्ही भरलेली सर्व माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Instant loans, Loan, Pay the loan, Sbi home loan