मराठी बातम्या /बातम्या /मनी /Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

हा असा व्यवसाय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांचा नाश्ता अपूर्ण आहे. आम्ही तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग (Start Poha Manufacturing Unit) युनिटबद्दल सांगत आहोत.

हा असा व्यवसाय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांचा नाश्ता अपूर्ण आहे. आम्ही तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग (Start Poha Manufacturing Unit) युनिटबद्दल सांगत आहोत.

हा असा व्यवसाय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांचा नाश्ता अपूर्ण आहे. आम्ही तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग (Start Poha Manufacturing Unit) युनिटबद्दल सांगत आहोत.

मुंबई, 07 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस संक्रमणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगारवाढ झाली नाही तर काहींचे बिझनेस ठप्प झाले. मात्र या काळात काही छोटेखानी व्यवयासायांनी उभारी घेतली. अनेकांनी नोकरी करता-करता छोट्या-मोठ्या व्यवसायांना सुरुवात केली. तुम्ही देखील स्वत:चा बिझनेस कमी पैशांत सुरू करू इच्छित असाल तर ही बिझनेस आयडिया (New Business Idea) तुमच्या फायद्याची ठरू शकते. कारण यामध्ये तुम्हाला किरकोळ गुंतवणूक करावी लागणार आहे.

हा असा व्यवसाय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांचा नाश्ता अपूर्ण आहे. आम्ही तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग (Start Poha Manufacturing Unit) युनिटबद्दल सांगत आहोत. यात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकते, कारण पोह्यांना दरमहा ठराविक मागणी असते. शिवाय हे पौष्टिक अन्न असल्याने अनेकांची पसंती देखील पोह्याला असते.

किती करावा लागेल खर्च?

खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन (Khadi and Village Industries Commission/KVIC) च्या एका प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, पोहा मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये जवळपास 2.43 लाख रुपयांचा खर्च आहे. यामध्ये 90टक्के तुम्हाला लोन मिळेल. अशावेळी तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग यूनिट उभारण्यासाठी सुरुवातीच्या काळात केवळ 25000 रुपयांचा खर्च करावा लागेल.

हे वाचा-उद्यापासून बंद होणार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी ही सुविधा,या आहेत गाइडलाइन

पोहा उत्पादन युनिटमध्ये आवश्यक माल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह काही छोट्या-छोट्या वस्तू आवश्यक असतील. KVIC अहवालात असे सांगण्यात आले आहे की, या व्यवसायाच्या सुरुवातीला थोडाच कच्चा माल आणावा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवता येईल. त्यामुळे अनुभवही चांगला येईल, तसेच व्यवसायही वाढेल.

हे वाचा-उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतर काय आहे इंधनाची किंमत,जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेल

कर्ज कसे मिळवायचे

KVIC च्या या अहवालानुसार, जर तुम्ही प्रकल्प अहवाल तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सुमारे 90 टक्के कर्ज मिळू शकते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

First published:
top videos

    Tags: Business News, Small business