मराठी बातम्या /बातम्या /मनी /

उद्यापासून बंद होणार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी ही सुविधा, वाचा काय आहेत गाइडलाइन

उद्यापासून बंद होणार सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी ही सुविधा, वाचा काय आहेत गाइडलाइन

कोव्हिड महामारीच्या (Coronavirus Pandemic Guideline) काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आता रद्द केल्या जात आहेत. बहुतेक सवलती 8 नोव्हेंबरपासून संपत आहेत.

कोव्हिड महामारीच्या (Coronavirus Pandemic Guideline) काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आता रद्द केल्या जात आहेत. बहुतेक सवलती 8 नोव्हेंबरपासून संपत आहेत.

कोव्हिड महामारीच्या (Coronavirus Pandemic Guideline) काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आता रद्द केल्या जात आहेत. बहुतेक सवलती 8 नोव्हेंबरपासून संपत आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 07 नोव्हेंबर: कोरोना काळात अनेक अटी आणि नियम लागू करण्यात आले होते. शिवाय या काळात काही सुविधाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान हळूहळू आता जीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता पुन्हा कोव्हिड आधीच्या काळाप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात होत आहे. कोव्हिड महामारीच्या (Coronavirus Pandemic Guideline) काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आता रद्द केल्या जात आहेत. बहुतेक सवलती 8 नोव्हेंबरपासून संपत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली (Biometric Attendance) उद्यापासून पूर्ववत करण्यात येत आहे.

बायोमेट्रिक हजेरीबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि कामाचे तास कमी करणे यासारख्या सवलती आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आता 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे.

हे वाचा-रेल्वेसह सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 80000 रुपयांपर्यंत कमाई; वाचा सविस्तर

केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल. सर्व कर्मचारी हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करतील. बायोमेट्रिक हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांना आपापसात सहा फुटांचे अंतर राखावे लागेल. शिवाय दरवेळी मास्क परिधान करणे या कर्मचाऱ्यांना अनिवार्य असेल.

बायोमेट्रिक मशीनचे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी नियुक्त कर्मचारी तैनात केले पाहिजेत. हे कर्मचारी हजेरी नोंदवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड गाइडलाइननुसार वर्तन करण्यासाठी मार्गदर्शनही करतील. बायोमेट्रिक मशिन संदर्भात सूचना देणारे परिपत्रक केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहे.

हे वाचा-Post Office PPF : पोस्ट ऑफिसची 'ही' योजना सुरक्षित करेल निवृत्तीनंतरचं आयुष्य

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात डीए आता 31 टक्के झाला आहे. वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आला आहे.

First published:

Tags: Corona, Corona updates, Government