• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतर काय आहे इंधनाची किंमत, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol-Diesel Price Today: उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतर काय आहे इंधनाची किंमत, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) 07 नोव्हेंबर रोजी देखील कोणताही बदल झालेला नाही. आयओसीएलने आज जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) 07 नोव्हेंबर रोजी देखील कोणताही बदल झालेला नाही. आयओसीएलने आज जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोलचे दर 109.98 रुपये आणि डिझेलचे दर 94.14 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. दिवाळी दिवशी 4 नोव्हेंबर 2021 रोजी इंधन दरात कपात (Fuel Price Cut) झाली होती. दिवाळी्या मुहुर्तावर मोदी सरकारने (Modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे. याचा परिणाम इंधनाच्या किंमतीवर होऊन दर उतरले आहेत. चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 07 November 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर हे वाचा-Ration Card: तुम्हालाही मिळतंय कमी धान्य? मग या नंबरवर कॉल करून लगेच करा तक्रार दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. हे वाचा-Post Office PPF : पोस्ट ऑफिसची 'ही' योजना सुरक्षित करेल निवृत्तीनंतरचं आयुष्य एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: