Home /News /money /

Rakesh Jhunjhunwala यांचा हा शेअर महिनाभरात 58% नी वधारला, तुम्ही केलीये का गुंतवणूक?

Rakesh Jhunjhunwala यांचा हा शेअर महिनाभरात 58% नी वधारला, तुम्ही केलीये का गुंतवणूक?

बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala portfolio) यांनी ज्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या स्टॉक्सची भरभराटच सुरू आहे. अशीच काहीशी परिस्थिती नजारा टेक्नॉलॉजीजच्या (Nazara Technoligies share) शेअर्सच्या बाबतीत पाहायला मिळाली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala portfolio) यांनी ज्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या स्टॉक्सची भरभराटच सुरू आहे. अशीच काहीशी परिस्थिती नजारा टेक्नॉलॉजीजच्या (Nazara Technoligies share) शेअर्सच्या बाबतीत पाहायला मिळाली आहे. गेल्या एका महिन्यात, नजारा टेकचे शेअर्स 1925.90 रुपयांवरून 3042.15 रुपयांवर गेले आहेत. या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 58% पर्यंत वाढले. यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा बाजारातील तज्ज्ञांना आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीने या कंपनीने आपले कर्ज कमी केले आणि आता ही कंपनी जवळपास कर्जमुक्त बनली आहे. जून तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांचा नजारा टेकमधील हिस्सा 10.82% होता. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की नजारा टेकमध्ये अजूनही दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी आहे. नजारा टेकचे शेअर्स पुढील 12 ते 18 महिन्यांत 4000 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतात. त्यामुळे तुमच्याकडेही या कंपनीच्या शेअर्समध्ये आताच गुंतवणूक करण्याची संधी आहे. वाचा-तुमच्याकडेही आहे PNB चे हे कार्ड तर मिळेल 2 लाख रुपयांचा फायदा, कसा मिळवाल लाभ? मिंटमधील वृत्तानुसार, कंपनीच्या मूलभूत तत्त्वांवर भाष्य करताना, स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट चे संशोधन प्रमुख संतोष मीणा म्हणाले, 'नजारा टेक ही आपल्या प्रकारची पहिली कंपनी आहे जी भारतीय शेअर बाजारावर सूचीबद्ध आहे. यात प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-स्पोर्ट्सचे आयपी आणि अॅसेट्स आहेत. ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय येत्या काळात अधिक वेगाने वाढेल, ज्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढेल अशी अपेक्षा आहे.' मीणा यांनी अशी माहिती दिली आहे की, कंपनीने चांगल्या व्यवसायाचे अधिग्रहण आणि विलीनीकरण करण्याची रणनीती स्वीकारली आहे. यामध्ये त्याने कंपनी समोरच्या कंपनीत विलीन केली आणि त्या कंपनीला बोर्डवर स्थान दिले. इनऑर्गेनिक पद्धतीने विस्तार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. वाचा-Gold Price: रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, तपासा आजचा भाव इक्विटी 99 चे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कंपनीने आपले कर्ज कमी केले आहे आणि जवळजवळ कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त आहे. नझारा टेकच्या शेअर्समध्ये 2400 ते 2600 च्या पातळीवर प्रवेश करता येतो. त्याचे शेअर्स पुढील 12 ते 18 महिन्यांत 4000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या