भारतीय सराफा बाजारात आज 13 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचा भाव वधारला आहे. तर चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Today) किमतीत चढ-उतार सुरू आहे
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: भारतीय सराफा बाजारात आज 13 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचा भाव वधारला आहे. तर चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Today) किमतीत चढ-उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. त्यानंतर सोने विक्रमी उच्चांकापासून (Gold Rate Record High) 8986 रुपयांनी स्वस्त झाले. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. दरम्यान आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स), डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज किरकोळ 0.3 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव (Silver price) 0.39 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.
वाचा-जर्मनीच्या या कंपनीत रिलायन्सची 218 कोटींची गुंतवणूक, बनवणार सिलिकॉन वेफर्सकाय आहे सोन्याचांदीचा आजचा भाव
डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज 0.3 टक्के वाढ झाल्यानंतर सोन्याचा दर 47,214 रुपये प्रति तोळावर आहे. तर चांदीच्या भावात 0.39 टक्के वाढ झाल्यानंतर दर 61,826 रुपये प्रति किलोवर आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
वाचा-Reliance समूहाचा आणखी एक मोठा करार, डेनमार्कच्या Stiesdal सह पार्टनरशिपअशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.