नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: यावर्षी मुहूर्त ट्रेडिंग (What is Muhurat Trading) दरम्यान गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दिवाळीदिवशी केवळ एका तासासाठी शेअर बाजारात व्यवहार होतात. या दरम्यान केल्या जाणाऱ्या व्यवहाराला 'मुहूर्त ट्रेडिंग' म्हटले जाते. या दिवाळीत स्टॉक (Stock Exchange Muhurat Trading) एक्स्चेंज 4 नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्रासाठी एक तासासाठी उघडेल. बीएसई आणि एनएसई गुंतवणूकदारांना दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची मुभा असेल. ब्रोकर मंडळी यावेळी लक्ष्मीपूजन आणि व्यापार करतात. मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये सामान्य व्यापारापूर्वी ब्लॉक डीलचे सेशन होते. यानंतर क्लोजिंग सेशन होते. गेल्या वर्षी, बीएसई सेन्सेक्स 145 अंकांच्या वाढीसह त्यावेळच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला होता. तर NSE चा निफ्टी 50, 12800 च्या खाली बंद झाला.
वाचा-आता करा खरेदी आणि पेमेंट महिनाभराने! वाचा काय आहे ही भन्नाट सुविधा
कधी होईल मुहूर्त ट्रेडिंग?
NSE च्या नोटिफिकेशननुसार, ब्लॉक डील सेशन 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:45 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल. यानंतर संध्याकाळी 6 ते 6:08 या वेळेत प्री-ओपन सेशन होईल. सामान्य शेअर बाजार संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत खुला असेल, त्यानंतर कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन आणि क्लोजिंग सेशन असेल. या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये करण्यात आलेल्या सर्व ट्रेडचे सेटलमेंट केले जाईल.
का करतात मुहूर्त ट्रेडिंग?
दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेदिवशी विक्रम संवतानुसार नवीन वर्षाची सुरुवातदेखील होते. या वेळी विक्रम संवत 2077 ची सुरुवात होणार आहे. भारतीय परंपरेनुसार, दिवाळीसह देशाच्या अनेक भागांमध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही होते. या शुभ वेळेला शेअर बाजारातले व्यापारी विशेष शेअर ट्रेडिंग करतात.
वाचा-JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची
मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणं शुभ मानलं जातं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः श्रीमंत व्यक्ती निश्चितपणे या दिवशी गुंतवणूक करतात. ते छोट्या गुंतवणुकीवर लाखो रुपये कमवतात. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर ट्रेडिंग करून सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्ष चांगलं जाण्याची इच्छा व्यक्त करतात. मुहूर्त ट्रेडिंग पूर्णपणे परंपरेशी संबंधित आहे. बहुतेक जण या दिवशी शेअर्स खरेदी करतात. ही गुंतवणूक अत्यंत लहान आणि प्रतीकात्मक असते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Savings and investments, Share market