मराठी बातम्या /बातम्या /मनी /

JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची संधी

JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची संधी

जिंदाल स्टेनलेस लि. (JSL) चा सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा पाच पटीने वाढून 411.62 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. उत्पन्न वाढल्याने कंपनीचा नफा (JSL Net Profit) वाढला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 27 ऑक्टोबर : जिंदाल स्टेनलेसच्या (Jindal Stainless) शेअरमध्ये आज जवळपास 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज जिंदाल स्टेनलेसचा शेअर बीएसईवर 1.95 टक्के वाढीसह 196 रुपयांवर ट्रेड (JSL Share Price) करत आहे. जिंदाल स्टेनलेस लि. (JSL) चा सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा पाच पटीने वाढून 411.62 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. उत्पन्न वाढल्याने कंपनीचा नफा (JSL Net Profit) वाढला आहे. यासह कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 80.64 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

जिंदाल स्टेनलेस (JSL) ने दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगला EBITDA नोंदवला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन आणि EBITDA वर परिणाम झाला, असं ICICI सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे.

Union Bank of India ची होम लोनवर धमाकेदार ऑफर, अतिशय कमी व्याजदरात मिळेल गृहकर्ज

JSL खरेदीचा तज्ञांचा सल्ला

ब्रोकरेजने जिंदाल स्टेनलेस स्टॉकवर 250 रुपये प्रति शेअरचं सुधारित टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग कायम ठेवली आहे. त्यांनी JSL साठी आपले अंदाज देखील वाढवले ​​आहेत. प्रोसेस इंडस्ट्री, पाईप्स आणि ट्यूब्स, रेल्वे आणि वॅगन्स, मेट्रो रेल यांसारखे सर्व प्रमुख विभागात स्टेनलेस स्टीलची मागणी वाढत आहे. जसजसे सामान्य उत्पादनाने वेग घेतला, तसतसे डुप्लेक्स आणि सुपर ऑस्टेनिटिक मध्येही मागणी वाढली.

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

शेअरमध्ये सहा महिन्यांत 140 टक्के वाढ

जिंदाल स्टेनलेस (JSL) हरियाणा, ओडिशा आणि इंडोनेशियामध्ये उत्पादन सुविधांसह भारतातील स्टेनलेस स्टील बाजारात आघाडीवर आहे. या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत 140 टक्के नफा दिला आहे. तर 2021 मध्ये तो आतापर्यंत 162 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market