मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm Postpaid: फेस्टिव्ह सीझनमध्ये शॉपिंगचं टेन्शनच राहणार नाही! एका महिन्याने करा पेमेंट

Paytm Postpaid: फेस्टिव्ह सीझनमध्ये शॉपिंगचं टेन्शनच राहणार नाही! एका महिन्याने करा पेमेंट

देशातील अनेक कंपन्या 'बाय नाऊ पे लेटर'ची सुविधा देत आहेत. ही संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या व्याजमुक्त कर्ज (Interest Free Loan Service) सुविधेअंतर्गत, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता आणि काही दिवसांनंतर पैसे देऊ शकता.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: सध्या सणासुदीचा काळ (Festive Season Shopping) सुरू आहे. ग्राहाकांनी या काळात अधिकाधिक शॉपिंग करावी याकरता अनेक कंपन्या विविध ऑफर्स देत आहेत. देशातील अनेक कंपन्या 'बाय नाऊ पे लेटर'ची सुविधा देत आहेत. ही संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या व्याजमुक्त कर्ज (Interest Free Loan Service) सुविधेअंतर्गत, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता आणि काही दिवसांनंतर पैसे देऊ शकता. दरम्यान डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम (Paytm Postpaid Service) देखील बाय नाउ पे लेटरची (Paytm Buy Now Pay Later Service) सुविधा देत आहे. कंपनीने या सेवेला पेटीएम पोस्टपेड असे नाव दिले आहे. पेटीएम पोस्टपेड आपल्या युजर्सना प्रोफाइलनुसार क्रेडिट मर्यादा देते. युजर्स क्रेडिट मर्यादेत खर्च करू शकतात आणि पुढील महिन्यात पेमेंट करू शकतात.

तुम्ही पेटीएम अॅपवर रिचार्ज, बिल पेमेंट किंवा खरेदी इत्यादींसाठी पेटीएम पोस्टपेड सेवा वापरू शकता. विशेष बाब म्हणजे पेटीएम पोस्टपेड युजर्स त्यांच्या आजूबाजूच्या किराणा दुकानातूनही याद्वारे खरेदी करू शकतात.

वाचा-JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची

पेटीएम पोस्टपेड कसे अॅक्टिव्ह कराल?

तुम्ही पेटीएम पोस्टपेड सेवेसाठी पात्र असल्यास, तुम्ही खाली दिलेली प्रक्रिया फॉलो करून पेटीएम पोस्टपेड सेवा सुरू करू शकता.

>> पेटीएम अॅप अपडेट करा आणि खात्यात लॉग इन करा.

>> होमपेजवर कर्ज आणि क्रेडिट कार्ड (Loans & Credit Cards) विभागात पेटीएम पोस्टपेडचा पर्याय दिसतो. अॅपमध्ये सर्च केल्यानंतरही पेटीएम पोस्टपेडचा पर्याय येतो.

>> त्यानंतर पेटीएम पोस्टपेड आयकॉनवर क्लिक करा.

वाचा-Gold Rate: धनत्रयोदशीआधी उतरले सोन्याचे दर, 4000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

>> यानंतर केवायसी पूर्ण करा. केवायसीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे.

>> केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमची पेटीएम पोस्टपेड सेवा सक्रिय होईल.

First published:

Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers