सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे बुडाले 3.20 लाख कोटी रुपये

Share Market, Union Budget, Nirmala Sitaraman - शेअर मार्केट कोसळल्यानं अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पैसे बुडाले

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 02:33 PM IST

सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे बुडाले 3.20 लाख कोटी रुपये

मुंबई, 8 जुलै : बजेटनंतर शेअर बाजार कोसळण्याचा सिलसिला सुरूच आहे. आज ( 8 जुलै ) शेअर बाजारात तेजीत विक्री पाहायला मिळाली. बँक, मेटल, आयटी, फायनान्स आणि आॅटोसह सर्व क्षेत्रांत घसरण होऊन कारभार सुरू असताना सेन्सेक्स 720.82 अंकांनी घसरून 38,792.57च्या स्तरावर आलाय. निफ्टीही 225.8 अंकांनी घसरून 11,585.35वर पोचला. बाजारात या वर्षातली ही सर्वात मोठी घसरण आहे. शेअर बाजारात आज इतकी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचे 3.20 लाख कोटी रुपये बुडाले.

बजेटमध्ये बँकांच्या बाबतीत एनबीएफसीबद्दल अनेक उपाय केले गेले. पण बजेटमध्ये केलेल्या घोषणांमुळे शेअर बाजारात निराशा झाली. बजेटनंतर बाजारात प्रचंड प्रमाणात विक्री झाली आणि सेन्सेक्स, निफ्टी मोठी घसरण होऊन बंद झाले. बीएसईच्या 30 शेअर्सचा मुख्य इंडेक्स सेन्सेक्स 394.67 अंकांच्या घसरणीनंतर 39513.39 या स्तरावर बंद झाला. तोच एनएसईचा 50 शेअर्सचा मुख्य इंडेक्स निफ्टी 135.60 अंकांबरोबर 11,811.15 च्या स्तरावर बंद झाला.

नौदलात 'या' पदांवर व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

शेअर बाजारात घसरणीचं कारण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी आपल्या भाषणात सेबीला कमीत कमी पब्लिक शेअर होल्डिंग 25 टक्क्यांहून वाढून 35 टक्के करायला सांगितलं. Helious Capitalचे समीर अरोरा म्हणाले की बजेटमध्ये FPIs साठी कुठलंही चांगलं पाऊल उचललं नाही. FPIs वर कर वाढल्यानं निराशा आलीय. सरचार्जमुळे एफपीआयसाठी LTCG, STCG कर वाढलाय. AIF फंड्समध्येही सरकारनं कर वाढवलाय.

Loading...

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

दुसरा फ्राॅड समोर आल्यानं PNBच्या शेअर्समध्ये 10 टक्के घसरण

पंजाब नॅशनल बँकेत फ्राॅड वाढतोय. कंपनीसोबत 3,805 कोटींची फसवणूक झाली. दुसरा मोठा घोटाळा समोर आल्यानंतर शेअर पडले. बँकेच्या शेअर्समध्ये 10 टक्के घसरण झालीय.

हायकोर्टानं स्वत:लाच ठोठावला एक लाखांचा दंड; जाणून घ्या कारण

शेअर बाजारात आज चहू बाजूंनी घसरण पाहायला मिळतेय. निफ्टीच्या आॅटो इंडेक्समध्ये 2.12 टक्के, एफएमसीजी इंडेक्स 1.15 टक्के, आयटी इंडेक्स 1.01 टक्के, मीडिया इंडेक्स 1.18 टक्के, मेटल इंडेक्स 0.15 टक्के, फार्मा इंडेक्स 0.31 टक्के आणि रियल्टी इंडेक्स 1.49 टक्क्यांच्या घसरणीनं कारभार करतोय.

VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...