हायकोर्टानं स्वत:लाच ठोठावला एक लाखांचा दंड; जाणून घ्या कारण

हायकोर्टानं स्वत:लाच ठोठावला एक लाखांचा दंड; जाणून घ्या कारण

हायकोर्टानं स्वत:लाच एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

  • Share this:

कोलकाता, 08 जुलै : चूक झाल्यानंतर दंड किंवा शिक्षा ठोठावण्याचं काम न्यायालयाचं असतं. न्यायालयाच्या काही निर्णयानंतर त्यावर नाराजी देखील व्यक्त केली जाते. तर, काही निर्णयांवर आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येतं. ट्रेनला उशिर झालेल्या प्रकरणात न्यायाधीशांना जबरदस्तीनं निवृत्त होण्यास सांगितलं होतं. यावेळी न्यायालयानं निर्णयावर स्वत:ला एक लाख रूपयाचा दंड देखील ठोठावला. महत्त्वाचं म्हणजे याचिकाकर्ते न्यायाधीश मिंटू मलिक यांनी ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय, न्यायाधीशांना जेवढे दिवस सेवानिवृत्त करण्यात आलं होतं तेवढे दिवस त्यांना आता सेवेत घेतलं जाणार आहे.

नातवाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं विकली जमीन !

न्यायालयानं का ठोठावला दंड? काय आहे प्रकरण

याचिकाकर्ते मिंटू मलिक हे सियालदल रेल्वे न्यायालयात न्यायधीश म्हणून काम करत होते. 5 मे 2007 रोजी मिंटू मलिक सियालदल रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत होते. पण, रेल्वे उशीरानं होती. त्यावेळी त्यांनी इतर प्रवाशांकडे देखील ट्रेनबाबत चौकशी केली असता ट्रेन नेहमीच उशिरानं असते अशी माहिती मिळाली. मिंटू मलिक यांनी याचा जाब ट्रेन चालकाला विचारला. पण, त्यांच्याकडून देखील अपेक्षित असं उत्तर मिळालं नाही. मिंटू मलिक यांनी याबाबतचा रिपोर्ट न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितला. ज्यावेळी हा रिपोर्ट न्यायालयासमोर ठेवला जाणार होता त्याच दिवशी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. परिणामी न्यायालयाच्या कामकाजाचे तीन तास वाया गेले. उच्च न्यायालयानं चौकशी केल्यानंतर मिंटू मलिक यांना 2007मध्ये निलंबित केलं. त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 2013मध्ये सेवानिवृत्त करण्यात आलं. याबाबत मिंटू मलिक यांनी राज्यपालांकडे देखील अपिल केलं. पण, राज्यपालांनी देखील मिंटू मलिक यांची अपिल फेटाळून लावली. त्य़ानंतर मिंटू मलिक यांनी 2017मध्ये कोलकाता न्यायालयात अपिल करत निर्णयाविरोधात दाद मागितली. यावर निर्णय देताना न्यायालयानं एक लाखांचा दंड ठोठावला शिवाय मिंटू मलिक यांना सेवेत देखील घेतलं.

VIDEO : 'बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं फक्त आशावाद'

First published: July 8, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading