नौदलात 'या' पदांवर व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

नौदलात 'या' पदांवर व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

Indian Navy, Recruitment - तुम्हाला भारतीय नौदलात नोकरी करायची आहे? मग चांगली संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती सुरू आहे. एकूण 2700 पदांवर भरती केली जाणार आहे. यात आर्टिफिशियल अपरेन्टिस ( AA ) आणि सीनियर सेकंडरी भरती ( SSR ) ही पदं आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार आॅफिशियल वेबसाइट joinindiannavy. gov.in वर आॅनलाइन अर्ज करू शकतात. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 जुलै. उमेदवारांनी लवकरच अर्ज पूर्ण करावा.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं सिलेक्शन कम्प्युटर आधारित परीक्षेनं होईल. यात SSR पदांवर उमेदवारांसाठी परीक्षा आयोजित केली जाईल. इथे 100 प्रश्नांची कम्प्युटर बेस्ड परीक्षा असते. त्यात प्रत्येकात 01 आकडा असेल. प्रश्न हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतील. आणि वस्तुनिष्ठ असतील. प्रश्नाला उत्तरांचे पर्याय असतील. याशिवाय फिजिकल फिटनेस टेस्ट ( PET ) उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. या पदांसाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी 205 रुपये आहे. SC/ST उमेदवारांसाठी अर्जाची फी नाही.

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

पदं आणि पदांची संख्या

आर्टिफिशियल अपरेन्टिस (AA) - 500

सीनियर सेकंडरी भरती (SSR ) - 2200

फेसबुकवर राजकारणाचा 'चिखल', राणे आणि शिवसेनेमध्ये सोशल वॉर

यानंतर होमपेजवर करियर आणि जाॅब्स आॅप्शनवर जा. त्यानंतर Become a Sailor लिंकवर क्लिक करा. इथे मागितलेली माहिती भरा आणि या पदांवर अर्ज करा.

मुंबई आणि परिसराला पावसानं झोडपलं, 10 महत्त्वाचे अपडेट्स

लष्कर, नौदल आणि वायू दल या तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. हा मुद्दा राज्यसभेत एका प्रश्नोत्तरादरम्यान संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला. राज्यमंत्र्यांनी सांगितलं, तीनही दलांमधली 78,291 पदं रिकामी आहेत. यात 9427 पदं अधिकारी रँकमधली आहेत. तर ज्युनियर लेव्हलची 68,864 पदं  रिकामी आहेत. दुसऱ्या बाजूला अधिकारी नोकरी सोडण्याचा सिलसिला सुरूच आहे.

मुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की

First Published: Jul 8, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading