अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

Share Market, Union Budget 2019 - शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळालीय. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात घसरणच सुरू आहे. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरलं नाही.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळालीय. 30 एप्रिलनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 600 हून अधिक घसरण होऊन सुरू आहे. निफ्टी  11600च्या खाली सुरू आहे.

मोठ्या शेअर्सबरोबर मिड आणि स्माॅल कॅप शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळतेय. बीएसईचा मिड कॅप 0.99 टक्क्यांनी घसरलाय आणि तो 14, 579.71च्या स्तरावर दिसतोय.BSE सेन्सेक्सची 621.15नं घसरण होऊन आता तो 38,892.24 या अंकांवर आहे.

शेअर बाजारात आज चहू बाजूंनी घसरण पाहायला मिळतेय. निफ्टीच्या आॅटो इंडेक्समध्ये 2.12 टक्के, एफएमसीजी इंडेक्स 1.15 टक्के, आयटी इंडेक्स 1.01 टक्के, मीडिया इंडेक्स 1.18 टक्के, मेटल इंडेक्स 0.15 टक्के, फार्मा इंडेक्स 0.31 टक्के आणि रियल्टी इंडेक्स 1.49 टक्क्यांच्या घसरणीनं कारभार करतोय.

काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात; तर भाजपकडून 2024 तयारी सुरू!

बँकिंग शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळतेय. निफ्टी 1.28 टक्क्यांच्या घसरणीबरोबर 31,073.60च्या स्तरावर सुरू आहे. PSU बँक इंडेक्समध्ये घसरण वाढलीय. निफ्टीचा पीएसयू बँक इंडेक्स 2.91 टक्के आणि खासगी बँक इंडेक्स 1.01 टक्क्यांच्या घसरणीनं सुरू आहे.

World Cup : मांजरेकरांचा टिवटिवाट, भारताच्या कामगिरीपेक्षा आफ्रिकेचा विजय मोठा!

बीएसईचा 30 शेअरवाला मुख्य इंडेक्स सेन्सेक्स 395.31 अंकांनी म्हणजे 1.00 टक्क्यांची घसरण होऊन 39,117च्या खाली दिसतोय. एनएसईचा 50 शेअर्सचा मुख्य इंडेक्स निफ्टी 132.05 अंक म्हणजेच 1.12 टक्क्यांच्या घसरणीनं 11, 680च्या खाली सुरू आहे.

हॉलीवुड सिनेमा पाहून कोटक महिंद्रा बँकेत दरोडा, चोरट्यांचा राडा CCTVमध्ये कैद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 5 जुलै रोजी बजेट सादर केल्यानंतर लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली होती. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरलं नाही. बजेट दरम्यान निफ्टी 112 अंकांनी कमी होऊन 11834 अंकांवर आला होता. तर सेन्सेक्स 350 पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन 39550च्या स्तरावर आला होता.निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत घसरण सुरू झाली होती.

VIDEO: मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला; मध्य रेल्वे उशिराने, रस्त्यांवर साचलं पाणी

First published: July 8, 2019, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading