• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • घसघशीत कमाईची संधी! याठिकाणी पैसे गुंतवून मिळेल डबल रिटर्न, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

घसघशीत कमाईची संधी! याठिकाणी पैसे गुंतवून मिळेल डबल रिटर्न, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

तुम्ही शेअर मार्केटमधून (Share Market) कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शुगर स्टॉक्स (Sugar Stocks) मध्ये पैसे गुंतवू शकता. वाचा काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 जुलै: तुम्ही शेअर मार्केटमधून (Share Market) कमाई करण्याचा विचार करत असाल तर शुगर स्टॉक्स (Sugar Stocks) मध्ये पैसे गुंतवू शकता. शुक्रवारी साखरेशी संबंधित या शेअर्सनी उच्चतम सर्किट (Upper circuit)ची मर्यादा पार केली होती. इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काही महिन्यात साखरेच्या किंमती (Sugar Price) 36-37 रुपये प्रति किलोने वाढण्याची अपेक्षा आहे. जर साखरेच्या किंमती वाढल्या तर शुगर स्टॉक्सवर देखील याचा परिणाम होईल आणि साखरेच्या शेअर्सच्या किंमतीही वाढतील. गुंतवणूकदारांना या शेअर्समधून गेल्या 1-2 महिन्यात 100% पेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. मार्केट तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात यामध्ये 52 टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. 4 महिन्यात 4 पट तेजी देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्योरिटीज (ICICI Securities) ने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये साखर क्षेत्रात सकारात्मक प्रवृत्ती असल्याचं म्हटलं आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, शुगर स्टॉकमध्ये चार महिन्यात 2 ते 4 पटींनी तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान साखर कंपन्यांच्या शेअर्सवर एक रिपोर्टही जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6 कंपन्यांचा सहभाग आहे. या अहवालाच्या मते, बलरामपूर साखरेचा शेअरचा भाव 344 रुपये आहे. याचा शेअर 515 रुपयांपर्यंत जाऊ शततो. यामध्ये 52 टक्के रिटर्नही मिळू शकतो. हे वाचा-तुमच्याकडे SBI चं हे खातं असेल तर मिळेल 2 लाखापर्यंतचा लाभ! वाचा कसा मिळेल फायदा डालमिया भारतच्या शेअरची किंमत आता 467 रुपये हे जी 650 रुपयांपर्यंत जाऊ शकते. अर्थात तुम्हाला 42 टक्के रिटर्न मिळू शकतो. तर त्रिवेणी इंजिनिअरिंगच्या शेअरचा भाव 199 रुपये आहे. येणाऱ्या काळात तो 270 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, यामध्ये 38 टक्के रिटर्नची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती एक चांगला रिटर्न मिळवण्याची संधी ठरू शकते. हे वाचा-BOI Alert! आज आणि उद्या या सेवा राहणार बंद, होऊ शकतो महत्त्वाच्या कामांचा खोळंबा काय आहे शेअर्सच्या किंमती वाढण्याचे कारण? तज्ज्ञांच्या मते, स्ट्रक्चरल ग्रोथमुळे शुगर स्टॉकच्या किंमती वाढत आहेत. हे यामुळे कारण सरकारने एथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम अतिशय वेगाने लागू केला आहे. अशा परिस्थितीत, ब्रोकरेज हाऊसने असा विश्वास व्यक्त केला आहे की साखर उद्योग दरवर्षी 60 लाख टनापेक्षा जास्त साखर उत्पादन करू शकतो. यामुळे साखर कंपन्यांचे उत्पन्न वाढेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: