नवी दिल्ली, 10 जुलै: देशातील एक महत्त्वाची बँक असणाऱ्या बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये तुमचं खातं असेल तर ही तुमच्यासाठी (BOI Customers) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी अत्यंत आवश्यक असा अलर्ट जारी केला आहे. बँकेच्या काही सेवा शनिवारी (10 जुलै) आणि रविवारी (11 जुलै) रोजी काही वेळाकरता काम करणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हा काही कामं पूर्ण करताना अडथळा येण्याची शक्यता आहे. बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ज्या सेवा प्रभावित होणार आहेत त्यामध्ये पीपीएफ डिपॉझिट, एसआय, एससीएसएस, आरबीआय बाँड स्टेटमेंट, सीबीडीटी चालान इ. सेवांचा समावेश आहे. बँकेने याबाबत अलर्ट जारी करत ग्राहकांना माहिती दिली आहे. या दरम्यान ग्राहकांना त्यांची काही महत्त्वाची काम पूर्ण करताना समस्या येऊ शकते.
का बंद असणार सेवा?
बँक ऑफ इंडियाने ट्वीट करत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये बँकेने या सेवा का बंद असणार याविषयी कारण दिलं आहे. बँकेकडून बँकिंग प्रणाली अपग्रेड करण्यासाठी आणि हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ग्राहकांसाठी सेवा वाढवता येतील. 10 जुलै सकाळी 12.45 पासून (12.45 am) ते 11 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत (09.00 pm) या दरम्यान इंटरनेट सेवा प्रभावित होणार आहेत.
हे वाचा-जुलैमध्ये 11 दिवस बंद राहणार बँका,लवकर पूर्ण करा काम; इथे तपासा सुट्ट्यांची यादी
ALERT!!! pic.twitter.com/NTyhFeBwQF
— Bank of India (@BankofIndia_IN) July 9, 2021
या बँकेच्या सेवा देखील राहणार ठराविक कालावधीसाठी बंद
देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी देखील काही सेवा आज आणि उद्यासाठी बंद असणार आहे. एसबीआयने (SBI) ट्वीट करत ग्राहकांना अशी माहिती दिली आहे मेंटेनन्स (Maintenance Activity) करता बँकेच्या काही सेवा 10 आणि 11 तारखेला प्रभावित होणार आहेत. 10 जुलै रात्री 10.45 वाजल्यापासून 11 जुलै रात्री 12.15 वाजेपर्यंत उपलब्ध असणार नाहीत. या दरम्यान इंटरनेट बँकिंग (Internet Banking), योनो (YONO), यूपीआय (UPI) आणि योनो लाइट (YONO Lite) या सेवा काम करणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details, Bank services