मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market updates: शेअर मार्केटवर Omicron चा परिणाम, Sensex आणि Nifty मध्ये मोठी घसरण

Share Market updates: शेअर मार्केटवर Omicron चा परिणाम, Sensex आणि Nifty मध्ये मोठी घसरण

Share Market updates: शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मार्केट सुरू होताच बाजारात घसरण पहायला मिळाली.

Share Market updates: शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मार्केट सुरू होताच बाजारात घसरण पहायला मिळाली.

Share Market updates: शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मार्केट सुरू होताच बाजारात घसरण पहायला मिळाली.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 20 डिसेंबर : भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) मोठी घसरण पहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीचं सत्र सोमवारी सुद्धा पहायला मिळालं. सोमवारी बाजार उघडताच Sensex आणि Nifty मध्ये एक मोठी घसरण दिसून आली. प्री ओपन सेशनमध्ये बीएसई सेंसेक्स 500 पॉईंट्सहून अधिक खाली आला आणि 56,500 वर पोहोचला होता. यानंतर बाजार उघडताच सेंसेक्स 675 पॉईंट्सने घसरुन 56,335 पॉईंट्सवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी 218 पॉईंट्सने घसरुन 16765 पॉईंट्सवर पोहोचला. (Share market falls: Sensex slips 1040 points and Nifty 300 points)

सकाळी 11.40 वाजता शेअर मार्केटमध्ये आणखी घसरण पहायला मिळाली. सेंसेक्स तब्बल 1400 पॉईंट्सहून अधिक घसरण होत 55582 पॉईंट्सवर पोहोचला. तर निफ्टीतही 440 पॉईंट्सहून अधिक घसरण झाल्याने 16500 पॉईंट्सवर पोहोचला.

गेल्या आठवड्यातही घसरण

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात सुद्धा घसरण पहायला मिळाली होती. सेंसेक्स 1,774.93 पॉईंट्सने म्हणजेच 3 टक्क्यांनी घसरुन 57,011 पॉईंट्सवर बंद झाला होता. तर निफ्टीतही 526 पॉईंट्सने घसरण होऊन 16,985 पॉईंट्सवर बंद झाला होता. दोन आठवड्यांत आलेल्या तेजीनंतर ही घसरण पहायला मिळाली होती.

वाचा : Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

ओमायक्रॉन आणि ग्लोबल मार्केटचा परिणाम

मार्केट एक्सपर्टच्या मते, जगभरात सुध्या सुरू असलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच गेल्या आठवड्यातही मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली होती. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली स्थितीही भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

तज्ज्ञांचा अंदाज काय? 

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच आहे. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधींचं नुकसान झालं असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. अशा प्रकारचे मार्केट करेक्शन होतच असतात आणि अशा मार्केट करेक्शन किंवा फॉलमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

वाचा : Amazon म्हणजे ‘डबल 420’, CAIT ने केली तातडीच्या कारवाईची मागणी

ओमायक्रॉनने वाढवली चिंता

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. यामुळे पुन्हा निर्बंध लावण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यासोबतच गुंतवणुकदार सुद्धा चिंतेत असून बाजारात गेल्या आठवड्यापासून प्रॉफिट बूकिंग आणि सेलिंग सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात Omicron रुग्णांची संख्या 50 पार

ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात वाढतच चालले आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ विदर्भ आणि मराठवाड्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. रविवारी (20 डिसेंबर) राज्यात पुन्हा 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. राज्यात आता रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य आरोग्य विभागाने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. 20 डिसेंबर रोजी राज्यात नवीन 6 रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये 4, पुणे 1 आणि 1 पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली होती, त्यातील 4 रुग्ण आढळले आहे.

First published:

Tags: Share market