मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon म्हणजे ‘डबल 420’, CAIT ने केली तातडीच्या कारवाईची मागणी

Amazon म्हणजे ‘डबल 420’, CAIT ने केली तातडीच्या कारवाईची मागणी

Amazon

Amazon

Amazon वर CCI नं केलेल्या कारवाईच्या आधारे त्यांचा भारतात व्यवसाय करण्याचा परवाना काढून घ्यावा, अशी मागणी CAIT नं केली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: अमेझॉन (Amazon) कंपनीला सीसीआयने (Competition commission of India) लावलेला 202 कोटींचा भलामोठा दंड (202 cr. Fine) हाच अमेझॉनच्या लबाडीचा ठोस पुरावा असून कंपनीवर लवकरात लवकर कडक कारवाई (Action) करण्याची गरज असल्याचं मत व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या कॅटनं (Confederation of All India Traders) व्यक्त केलं आहे. अमेझॉन कंपनी ही सतत भारत सरकारचे नियम आणि निकष मोडून काम करत असल्याचं यातून सिद्ध झाल्याचा दावाही कॅटनं केला आहे. ई-कॉमर्स आणि रिटेल या दोन्ही क्षेत्रातील स्पर्धा संपवून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा अमेझॉनचा डाव हाणून पाडण्याची गरज असल्याचं मत कॅटनं व्यक्त केलं आहे.

एकाधिकारशाहीला विरोध

भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या अमेझॉनला गैरमार्गाने रिटेल क्षेत्रातही आपलं वर्चस्व निर्माण करण्याची इच्छा असल्यामुळे कंपनीकडून सतत गैरमार्गांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप कॅटनं केला आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भार्तीया आणि जनरल सेक्रेटरी प्रवीण खंडेलवाल यांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात अमेझॉनवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका भारतीय कंपनीला विदेशी कंपनीकडून खरेदी करण्याचा होत असणारा छुपा प्रयत्न हा गंभीर विषय़ असून त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अमेझॉनच्या उद्धटपणाचा निषेध

सध्याच्या ताज्या प्रकरणात अमेझॉननं सीसीआयला दिलेल्या उत्तरात कॅटचा उल्लेख स्ट्रेंजर असा केला होता. हा उल्लेख अपमानजनक असून त्याची संघटनेनं गंभीर दखल घेतली असल्याची बाब कॅटनं अधोरेखित केली आहे. अमेझॉननं गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे केलेल्या व्यवहारामुळे छोट्या व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक मोबाईल दुकानं यामुळं बंद पडली आहेत. अमेझॉन, मोबाईल कंपन्या, खासगी आणि सरकारी बँका यांच्या अभद्र युतीचा परिणाम दुकानदारांच्या व्यापारावर झाल्याचा आरोप संघटनेनं केला आहे.

व्यापाऱ्यांचं अधिक नुकसान टाळण्यासाठी कॅटला या प्रकरणात पुढाकार घेण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

सीसीआयची कारवाई गंभीर

अमेझॉनवर माहिती लपवणे, छुपी उद्दिष्टे ठेवणे यासारख्या कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे. अमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी देशाबाहेर पाठवलेले ईमेलदेखील त्यांचे इरादे उघड करणारे असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अधिक विलंब न करता सरकारनं कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी कॅटनं केली आहे.

हे वाचा- बायकोला देणारे होता सरप्राईज गिफ्ट, हातावर टॅटू काढताना झाला मोठा पोपट

व्यवसाय बंद करावा

सीसीआयनं केलेल्या कारवाईचा आधार घेत अमेझॉनची भारतात व्यवसाय करण्याची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी कॅटनं केली आहे. सध्याची सीसीआयची ऑर्डर हा पुरेसा पुरावा असून त्याआधारे ही कारवाई करता येऊ शकेल, असं कॅटनं म्हटलं आहे. भारतात येऊन विदेशी कंपन्या मनमानी करू शकत नाहीत, हा संदेश देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Amazon, Business, Illegal