मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

म्युच्युअल फंडातून (Mutual Fund) पैसे काढताना, तुम्ही ज्या आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली होती ती पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करा. तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर म्युच्युअल फंडातून पैसे काढणे टाळावे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 19 डिसेंबर : गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड (Mutual Fund) अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे विशेषतः म्युच्युअल फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. अनेकदा असे दिसून येते की जेव्हा चांगला परतावा मिळतो तेव्हा गुंतवणूकदार प्रॉफिट बुकींग आणि मार्केटमधून बाहेर पडण्याचा विचार करू लागतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्हाला म्युच्युअल फंडातून पैसे काढायचे असतील तर तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

आर्थिक उद्दिष्टे (Financial Goal)

म्युच्युअल फंडातून पैसे काढताना, तुम्ही ज्या आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली होती ती पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करा. तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर म्युच्युअल फंडातून पैसे काढणे टाळावे.

पैसे कधी काढायचे, कधी नाही

शेअर आणि कमोडिटी मार्केटच्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारही पैसे काढण्याचा निर्णय घेतात. वास्तविक, गुंतवणूकदार म्हणून एखाद्याने बाजार चढत असताना नफा बुक केला पाहिजे. जेव्हा शेअर्सच्या किमती खाली येत असतील तेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक करावी. मार्केटला वेळ द्यायलाच हवा पण रणनीतीने द्यायला हवा.

1 जानेवारीपासून 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी चार्ज लागणार, किती खर्च वाढणार?

इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी पण याचा अर्थ असा नाही की पैसे गुंतवल्यानंतर आरामात बसावे. आर्थिक सल्लागाराच्या मदतीने फंडाच्या कामगिरीचा नियमितपणे आढावा घ्या. जर आर्थिक सल्लागार तुम्हाला निरुपयोगी किंवा कमकुवत फंडातून बाहेर पडण्याचा सल्ला देत असेल तर तुम्ही इतर कोणत्याही फंडात जाऊ शकता.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला पैसे काढायचे असतील, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने इक्विटी गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा विचार करू शकता. आपण डेब्ट फंड (Debt Fund) मध्ये गुंतवणूक करू शकता. हे तुलनेने कमी धोकादायक मानले जातात. जर एखाद्या गुंतवणूकदाराला बाजारातील बदलत्या हालचालींचा फायदा घ्यायचा असेल, तर बदलत्या बाजार परिस्थितीनुसार फंड प्रकार बदलण्यासाठी सॅटेलाइट पोर्टफोलिओचा वापर करा.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds