मुंबई, 19 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण राज्यात वाढतच चालले आहे. मुंबई (mumbai), पुणे (pune) पाठोपाठ विदर्भ आणि मराठवाड्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. आज राज्यात पुन्हा 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. राज्यात आता रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्य आरोग्य विभागाने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. आज राज्यात नवीन 6 रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये 4, पुणे 1 आणि 1 पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली होती, त्यातील 4 रुग्ण आढळले आहे.
मुंबईमध्ये विमानतळावर सर्व्हेक्षणातून जे ४ रुग्ण आढळून आले आहे, त्यामध्ये १ रुग्ण हा मुंबईतला आहे. तर २ रुग्ण हे कर्नाटक राज्यातील आहे. तर एक रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे. यातील दोन जणांनी टांझानियाचा तर २ जणांनी इंग्लंडचा प्रवास केला आहे. या ४ ही रुग्णांनी पूर्ण लसीकरण केलेले आहे. या सर्वांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Year Ender 2021: कोरोनाकाळात बेरोजगारीत झाली प्रचंड वाढ; धक्कादायक आकडेवारी समोर
तर पुण्यातील जुन्नरमध्ये परदेशी प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या एका ५ वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. पण, या मुलामध्ये कोणतीही लक्षणं आढळून आली नाही. तर पिंपरी चिंचवडमध्ये मध्यपूर्वेत प्रवास करून आलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णाला सौम्य लक्षण जाणवत आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण संख्याही मुंबईत आहे. मुंबईत आतापर्यंत 22 रुग्ण सापडले आहे. तर त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये ११ आणि पुणे ग्रामीण भागात ७ रुग्ण आढळले आहे. पुणे शहरात ३ रुग्ण आढळले आहे.
पुढील आठवड्यात बाजाराची दिशा कशी असेल? 'हे' घटक ठरतील महत्वपूर्ण
मेट्रो शहरांपाठोपाठ मराठवाडा आणि विदर्भातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. उस्मानाबाद, बुलडाणा, लातूर आणि नागपूरमध्येही रुग्ण आढळले आहे. या सर्व रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आतापर्यंत ओमायक्रॉनमुळे चिंतेचं वातावरण असलं तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. आतापर्यंत 28 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यात सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे या 28 रुग्णांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.