मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Weekly Multibagger Stocks: हे आहेत या आठवड्यातील टॉप 5 मल्टीबॅगर स्टॉक्स, गुंतवणूकदार झाले मालामाल

Weekly Multibagger Stocks: हे आहेत या आठवड्यातील टॉप 5 मल्टीबॅगर स्टॉक्स, गुंतवणूकदार झाले मालामाल

Weekly Multibagger Stocks: या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये (Share Market Latest News) एकाही शेअरने विकली टॉप गेनरमध्ये (Weekly Top Gainers) 50% रिटर्न दिला नाही. यावेळी जास्तीत जास्त रिटर्न 47.83% आहे.

Weekly Multibagger Stocks: या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये (Share Market Latest News) एकाही शेअरने विकली टॉप गेनरमध्ये (Weekly Top Gainers) 50% रिटर्न दिला नाही. यावेळी जास्तीत जास्त रिटर्न 47.83% आहे.

Weekly Multibagger Stocks: या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये (Share Market Latest News) एकाही शेअरने विकली टॉप गेनरमध्ये (Weekly Top Gainers) 50% रिटर्न दिला नाही. यावेळी जास्तीत जास्त रिटर्न 47.83% आहे.

मुंबई, 05 फेब्रुवारी:  या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये (Share Market Latest News) एकाही शेअरने विकली टॉप गेनरमध्ये (Weekly Top Gainers) 50% रिटर्न दिला नाही. यावेळी जास्तीत जास्त रिटर्न 47.83% आहे. टॉप 5 बद्दल बोलायचं झाल्यास, पाचव्या क्रमांकावर रिटर्न देणाऱ्या स्टॉकने 34.39% चा विकली रिटर्न दिला आहे. या आठवड्यातही अनेक स्टॉक असे होते ज्यांनी 30 टक्क्यांपर्यंत मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Return) दिला. तर, आज आम्ही तुम्हाला शुक्रवारी (4 फेब्रुवारी, 2022) संपलेल्या आठवड्यातील असे स्टॉक्स सांगत आहोत, ज्यांनी सर्वाधिक रिटर्न दिला आहे.

ज्यांनी गेल्या आठवड्यात सर्वाधिक रिटर्न दिले आणि गुंतवणूकदारांना मालामाल केलं. त्यामध्ये भारत रोड नेटवर्क, क्लारा इंडस्ट्रीज, अंबिका कॉटन मिल्स लि., जिंदाल ड्रिलिंग आणि नाहर कॅपिटल अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांचा समावेश आहे.

भारत रोड नेटवर्क (Bharat Road Network)

भारत रोड नेटवर्कच्या स्टॉकने गेल्या आठवड्यात 47.83 टक्के इतका सर्वात चांगला परतावा (return) दिला आहे. 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात स्टॉक 36.8 रुपयांवर बंद झाला, तर 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात तो 54.4 रुपयांवर बंद झाला. जर कोणी BSC वर ट्रेड केलेल्या या स्टॉकमध्ये गेल्या आठवड्यात ₹ 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर या आठवड्याच्या अखेरीस त्याचे ₹ 1,47,000 झाले असतील.

हे वाचा-आता जमिनींसाठीही असणार 'आधार' सारखा नंबर, PM KISAN योजनेसाठी ठरेल फायदेशीर

क्लारा इंडस्ट्रीज (Clara Industries)

या आठवड्यात सर्वाधिक रिटर्न देणाऱ्यांमध्ये क्लारा इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांनी एका आठवड्यात 42.09 टक्के रिटर्न दिले. गेल्या आठवड्यात क्लारा इंडस्ट्रीजचा शेअर 74.25 रुपयांवर बंद झाला, तर यावेळी तो 105.5 रुपयांवर बंद झाला. जर कोणी गेल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये ₹ 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत तो 1,42,000 रुपयांचा मालक झाला असेल.

अंबिका कॉटन मिल्स लिमिटेड (Ambika Cotton Mills Ltd.)

अंबिका कॉटन मिल्स लिमिटेडच्या स्टॉकने या आठवड्यात 38.88% रिटर्न दिला आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक 1,985.85 वर बंद झाला होता, तर या आठवड्यात तो 2,757.95 वर बंद झाला आहे.

जिंदल ड्रिलिंग (Jindal Drilling)

जिंदाल ड्रिलिंगने 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 37.27% रिटर्न दिला आहे. 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात या स्टॉकचा क्लोजिंग 150.8 वर झाला होता, तर या आठवड्यात या स्टॉकमध्ये 207 रुपयांवर बंद झाला आहे. जर कोणी या स्टॉकमध्ये 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर तो आतापर्यंत 1,37,000 रुपयांचा मालक झाला असेल.

हे वाचा-Petrol Diesel Prices Today:पेट्रोल-डिझेल दर जारी,तपासा मुंबईतील आजचा लेटेस्ट भाव

नाहर कॅपिटल अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (Nahar Capital & Financial Services Ltd.)

नाहर कॅपिटल अँड फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर या आठवड्यात 558 रुपयांवर बंद झाला, तर मागील आठवड्यात शेअर 415.2 रुपयांवर बंद झाला. दोन्ही आठवड्यांच्या किमतीत 34.39 टक्क्यांचा फरक आहे. त्यानुसार, जर कोणी या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत त्याचे 1,37,000 रुपये झाले असतील.

First published:

Tags: Finance, Investment, Money, Share market, Stock exchanges, Stock Markets