जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेल दर जारी, तपासा मुंबईतील आजचा लेटेस्ट भाव

Petrol Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेल दर जारी, तपासा मुंबईतील आजचा लेटेस्ट भाव

Petrol Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेल दर जारी, तपासा मुंबईतील आजचा लेटेस्ट भाव

इंधन दर वाढ नसला, तरी आधीच वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी इंधन दर बदलले होते. त्यानंतर अद्याप दर स्थिर आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : आज 5 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे रेट (Petrol Diesel Prices Today) जारी झाले आहेत. सरकारी तेल कंपनी IOCL ने पेट्रोल-डिझेल दरात आज कोणतेही बदल केलेले नाहीत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. मागील जवळपास तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल दर स्थिर असून कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र किमती कमी देखील होत नसल्याने सर्वसामान्यांना अद्यापही 100 रुपयांहून अधिक किंमत मोजावी लागत आहे. इंधन दर वाढ नसला, तरी आधीच वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी इंधन दर बदलले होते. त्यानंतर अद्याप दर स्थिर आहेत. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

हे वाचा -  रिटायरमेंटपूर्वी व्हाल करोडपती, गुंतवणूकीचा ‘हा’ पर्याय ठरेल एकदम BEST

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. महाराष्ट्रील आजचा पेट्रोल दर -

पुणे109.45 रुपये92.25 रुपये
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
रायगड109.48 रुपये92.25 रुपये
परभणी112.49 रुपये95.17 रुपये
पालघर109.75 रुपये92.51 रुपये
सांगली110.03 रुपये92.83 रुपये
कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

हे वाचा -  तीन महिन्यात 50 हजारांची गुंतवणूक 10 लाखांवर; ‘या’ शेअरमुळे छप्परफाड कमाई!

इंधन दर 4 नोव्हेंबर 2021 पासून बदललेला नाही. त्यावेळी सरकारने पेट्रोल उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून इंधन दर स्थिर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात