नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती (Rakesh Jhunjhunwala Net worth) गेल्या काही दिवसांपासून अनेक पटींनी वाढली आहे. याचे मुख्य कारण आहे नजारा टेक, टायटन कंपनी, टाटा मोटर्स सारख्या शेअर्ममध्ये त्यांची गुंतवणूक आहे. टाटा मोटर्सच्या शेअर किमतीचा इतिहास पाहता, राकेश झुनझुनवाला यांनी या शेअरमधून फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये 310 कोटी रुपये कमावले आहेत. 6 ऑक्टोबर 2021 रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 335.60 रुपये होती, जी फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये वाढून 417.80 रुपये झाली. म्हणजेच, टाटा मोटर्सचे शेअर्स अवघ्या तीन दिवसात 25% पर्यंत चढले. राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये 1.14% हिस्सा आहे. त्यानुसार, त्याने फक्त तीन व्यापार सत्रांमध्ये 310 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. सोमवारी 7.39 टक्के तेजी टाटा मोटर्सचा शेअर सोमवारी, BSE वर 7.39 टक्क्यांच्या वाढीसह 411.25 रुपयांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, टाटा मोटर्स DVR चे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह 201.10 रुपयांवर बंद झाले. वाचा- Gold Rate Today: सोन्याचा दर 9059 रुपयांनी स्वस्त, तपासा आजचा लेटेस्ट भाव जून 2021 च्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांचे कंपनीमध्ये एकूण 3,77,50,000 शेअर्स होते. हे कंपनीच्या एकूण 1.14% समभागाच्या बरोबरीचे आहेत. यापूर्वी मार्च 2021 च्या तिमाहीत, झुनझुनवालाकडे टाटा मोटर्सचे 4,27,50,000 शेअर्स होते. जून तिमाहीत झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील हिस्सा कमी केला होता. वाचा- Petrol-Diesel Price today: IOCL कडून नवे दर जारी, मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर काय आहे तज्ज्ञांचा सल्ला? टाटा मोटर्सच्या शेअर्सचे नवीन ब्रेकआउट 400 रुपयांवर आहे असा असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. जर या स्टॉकने हा स्तर ओलांडला तर त्यात आणखी तेजी येईल. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक समीत बगडिया म्हणाले, ‘टाटा मोटर्सचे नवीन ब्रेकआउट 400 रुपये आहे. याचा अर्थ असा की तो अजूनही चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसत आहे. स्टॉप लॉस 390 रुपये ठेवताना 450 रुपयांच्या लक्ष्याने हा शेअर खरेदी केले जाऊ शकते.’ (डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुणालाही https://lokmat.news18.com/ वरून पैसे गुंतवण करण्याचा सल्ला दिला जात नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.