• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Rate Today: सोन्याचा दर 9059 रुपयांनी स्वस्त, तपासा आजचा लेटेस्ट भाव

Gold Rate Today: सोन्याचा दर 9059 रुपयांनी स्वस्त, तपासा आजचा लेटेस्ट भाव

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Today) किमतीत चढ-उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Today) किमतीत चढ-उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. त्यानंतर सोने विक्रमी उच्चांकापासून (Gold Rate Record High) 9059 रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स), डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज 0.19 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव (Silver price) 0.02 टक्के किंचित वाढीसह व्यवहार करत आहेत. काय आहे सोन्याचांदीचा दर? डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज 0.19 टक्के वाढ झाल्यानंतर सोन्याचा दर 47,141 रुपये प्रति तोळावर आहे. तर चांदीच्या भावात 0.02 टक्के किरकोळ वाढ झाल्यानंतर दर 60,963 रुपये प्रति किलोवर आहे. वाचा-LPG Gas बुकिंगवर 10000 पर्यंत सोनं जिंकण्याची संधी,Paytm वरुन करावं लागेल बुकिंग रेकॉर्ड स्तरापेक्षा दर 9059 रुपयांनी स्वस्त सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9059 कमी आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. आज भाव 47,141 रुपये प्रति तोळा आहे. त्यामुळे रेकॉर्ड स्तरापेक्षा सोन्याचा दर 9059 रुपयांनी कमी आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. वाचा-फाटलेल्या नोटा घेऊन RBI त्याचं नेमकं काय करतं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: