मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price today: IOCL कडून नवे दर जारी, मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, तर डिझेल शंभरीपार

Petrol-Diesel Price today: IOCL कडून नवे दर जारी, मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, तर डिझेल शंभरीपार

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत पेट्रोल दरात 2.80 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ करण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत पेट्रोल दरात 2.80 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ करण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत पेट्रोल दरात 2.80 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ करण्यात आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. अनेक दिवसांच्या सततच्या वाढीनंतर आज इंधन दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. सोमवारी पेट्रोल दरात 30 पैसे प्रति लीटर, तर डिझेल दरात 35 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती.

या महिन्यात पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत पेट्रोल दरात 2.80 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ करण्यात आली आहे.

चार महानगरातील पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 12 October 2021) -

>> दिल्ली पेट्रोल 104.44 रुपये आणि डिझेल 93.17 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 101.79 रुपये आणि डिझेल 97.59 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 105.09 रुपये आणि डिझेल 96.28 रुपये प्रति लीटर

Job Opportunity: विश्वसनीय Post Office ची फ्रेंचाइजी उघडा; दरमहा होईल मोठी कमाई

देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike