नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार (Stock Market Latest News) विक्रमी उच्चांकावर आहे. या कालावधीत, अनेक शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (Multibgger Stock Return) दिला आहे. यावर्षी आतापर्यंत अनेक छोटे, मध्यम आणि मोठे स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Good Return in Share Market) दिला आहे. जाणून घ्या अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल, ज्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच श्रीमंत केले. गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरने (Gita Renewable Energy Share) चांगला परतावा दिला आहे.
बीएसईमध्ये सूचीबद्ध असणारा हा एनर्जी स्टॉक (BSE listed Energy stock) असून त्याची किंमत गेल्या एका वर्षात 5.52 रुपयांवरून 233.50 प्रति शेअर (Gita Renewable Energy Share Price) या पातळीवर वाढली आहे. या काळात सुमारे 4130 टक्के वाढ झाली आहे. 13 ऑक्टोबर 2020 रोजी हा मल्टीबॅगर स्टॉक बीएसई वर 5.52 रुपये प्रति शेअर वर बंद झाला होता, तर 14 ऑक्टोबर 2021 रोजी ₹233.50 वर बंद झाला. गेल्या एका वर्षात शेअर जवळपास 42 पट किंवा 4,130 टक्क्यांनी या शेअरचा भाव वाढला आहे.
वाचा-खूशखबर! LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित Cashback, वाचा कसं कराल बुकिंग?
गीता रिन्यूएबल एनर्जीच्या स्टॉक हिस्ट्रीनुसार हा शेअर गेल्या आठवड्यातील पाच सत्रामध्ये देखील पाच टक्क्यांनी वरची पातळी कायम ठेवली आहे. या काळात 21.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात हा शेअर ₹88.20 वरून ₹233.50 पर्यंत वाढला आहे. अर्थात या कालावधीमध्ये जवळपास 165 टक्क्याची वाढ झाली आहे. सहा महिन्यांच्या इतिहास पाहता, सहा महिन्यांपूर्वी 29.40 रुपयांवर असणारा हा शेअर आज ₹233.50 पर्यंत वाढला आहे. या काळात शेअरधारकांना या स्टॉकने 695 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये विशेष वाढ झाली आहे. 2021 मध्ये या शेअरमध्ये जवळपास 3,230 टक्के वाढ झाली आहे.
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्या गुंतवणूकदाराने आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹1.21 लाख झाले असते. जर गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्याचे ₹1 लाख आज ₹2.65 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या काउंटरमध्ये 1 लाख गुंतवले असते आणि आजपर्यंत ते होल्ड केले असते, तर त्याचे ₹1 लाख आज ₹ 7.95 लाख झाले असते.
वाचा-Jhunjhunwala यांच्या या शेअरने यावर्षी दिलाय तिप्पट रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
तसंच जर गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी या मल्टीबॅगर गीता रिन्यूएबल एनर्जीच्या स्टॉकमध्ये ₹ 5.52 प्रति शेअर या दराने गुंतवणूक केली असेल आणि तर ती गुंतवणूक अजूनही एखाद्याने होल्ड केली असेल तर त्याला मोठा नफा मिळेल. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी 1 लाख गुंतवले असतील तर त्याचे आज 42.30 लाख रुपये होतील.
(डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुणालाही https://lokmat.news18.com/ वरून पैसे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market